shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंगणवाडी क्रमांक १०८ मध्ये स्तनपान सप्ताह व निरोप समारंभ..!!



देवळाली प्रवरा प्रतिनिधी:
येथील एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी क्रमांक १०८मध्ये स्तनपान सप्ताह व श्रीशा अजित निकत हिचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. 
 
यावेळी देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक, सहा. प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, सौ.माधवी निकत, पत्रकार राजेंद्र उंडे,सविता हारदे इ मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अंगणवाडी सेविका शर्मिला रणधीर यांनी सर्वांचे स्वागत करून स्तनपान सप्ताहाचे महत्त्व सांगितले व श्रीशा अजित निकत हिस निरोप देण्याबाबत माहिती विशद केली.

सुदर्शन जवक, सुनील गोसावी यांनी स्तनपान सप्ताह निमित्त शुभेच्छा दिल्या. श्रीशा हिचा भेटवस्तु देऊन बाळ गोपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मदतनिस अनिता भालेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जनाबाई गायकवाड, रेखा संसारे, अर्चना पंडित, सुमय्या शेख, स्मिता संसारे, प्रज्ञा थोरात, आरती मकासरे यांच्यासह  गरोदर व स्थनदा महिला, बालके उपस्थित होते.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close