स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिलं म्हणूनच या देशाला स्वातंत्र्य मिळाल - मोहोळ चे आमदार यशवंत माने.
एन .ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिलं . त्यांनी बलिदान दिलं म्हणूनच या देशाला स्वातंत्र्य मिळाल. या स्वातंत्र्य सैनिकांचे मी मनापासून आभार मानतो. असे निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित एन .ई .एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ,ता. इंदापूर, जि. पुणे येथे स्वातंत्र्य दिना दिवशी मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी भाषणामध्ये मत व्यक्त करत असताना त्यांनी गौरव उद्गार काढले.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष निमसाखर गावचे माजी उपसरपंच पोपटराव कारंडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मोहोळचे आमदार यशवंत माने हे उपस्थित होते. आमदार यशवंत माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आमदार यशवंत तात्या माने यांनी सर्व ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यावेळी संस्थेचे सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे, संस्था उपाध्यक्ष संजय कुमार सूर्यकांत रणवरे उर्फ पप्पू पाटील, यशवंत विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे विद्यालयाचे प्राचार्य, चंद्रकांत गोपाळराव रणवरे, सुप्रसिद्ध उद्योजक विनोद रणसिंग, निमसाखर ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सदस्य, विकास सोसायटीचे सर्व आजी-माजी सदस्य अधिकारी पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर, निमसाखर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळी, पालक वर्ग, आजी-माजी स्वतंत्र सैनिक, यावेळी उपस्थित होते.
तसेच आ.यशवंत माने पुढे म्हणाले की,निमसाखर सारख्या ग्रामीण भागामध्ये 1962 सालापासून आपले सर्वांचे गुरु कै. सूर्यकांत आप्पा रणवरे व त्यांचे बंधू कै. गुलाबराव रणवरे यांनी या ग्रामीण भागामध्ये सर्व मुलांच्या शिक्षणाची सोय होण्याच्या उद्देशाने या शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या शिक्षण संस्थेचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर होत असताना आपण पाहत आहोत. जवळजवळ ८७७ मुलं मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. १९६२ सालापासून या संस्थेमधून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या उज्वल आयुष्याला सुरुवात केलेल्या विद्यार्थी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी झाले आहेत. ते या संस्थेची देणगी आहे. त्या रूपाने त्यांच्याकडे आपण पाहत राहतो . या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार रणवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था उत्तमरीत्या काम करत आहे. या ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारची शिक्षण संस्था चालत आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ,ग्रामस्थ या शिक्षण संस्थेला साथ देतातच कारण माझ्या या ठिकाणी बराच वावर असतो .या शिक्षण संस्थेला मदत करतात त्याबद्दल मी आभार मानतो. या ठिकाणी मी आणि आमचे मित्र धनंजय रणवरे यांनी संस्थेच्या मदतीला सांगितल्यानंतर ते देण्याचा प्रयत्न करत असतो. या पुढील काळामध्ये या आपल्या संस्थेला नक्कीच मदत करीन आज सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
आजचा दिवस हा ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, आपले प्राण पणाला लावले अशा हुतात्म्यांच्या स्मरणाचा दिवस आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशसेवा, देशभक्ती, रुजली पाहिजे असे मत संस्था सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे यांनी व्यक्त केले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पिंटू निगडे देशमुख यांच्या सौजन्याने विद्यालयासाठी डायस भेट देण्यात आला. तर कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक भोसले सरांनी पाच गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. क्रीडा शिक्षक प्रमोद चव्हाण सर व सिकंदर मुलानी सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजिनाथ मलगुंडे सर यांनी केले तर वैभव हणमंते सर यांनी आभार मानले.

