shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पडस्थळ येथे महिला सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

पडस्थळ येथे महिला सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
इंदापूर प्रतिनिधी:भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन पडस्थळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य वीरांच्या आठवणी जागवल्या. पडस्थळ ग्रामपंचायत मार्फत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला रोपटे देऊन त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली. राज्यस्तर, जिल्हास्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
पडस्थळ गावामध्ये प्रथमच महिला सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पडस्थळ गावच्या सरपंच वैशालीताई मारकड,उपसरपंच सपना बोंगाणे, ग्रामपंचायत सदस्या विद्या बोंगाणे, प्रियंका गव्हाणे, रेश्माताई रेडके, अश्विनी कोळेकर, तलाठी राजश्री ढमे, बेगम झेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दीपस्तंभ आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेश घोळवे यांचा सन्मान करण्यात आला.  गुणवत्ता व पटसंख्या वाढीबद्दल मुख्याध्यापक रमेश जाधव तसेच संतोष हेगडे व ठाकर गुरुजी यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी मुलांनी इंग्रजी व मराठी माध्यमातून आपले वकृत्व सिद्ध केले. सरपंच वैशालीताई  मारकड, चेअरमन भारत बोंगाणे, आप्पाभाऊ मारकड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच हरिदास रेडके, उद्धव गव्हाणे, विक्रम बोंगाणे, पांडुरंग मारकड, संदिपान मारकड, आप्पाभाऊ मारकड, ग्रामसेवक महेश यादव, सोसायटीचे चेअरमन भारत बोंगाणे, केरदास पवार,पोलीस पाटील गणेश राऊत,विलास कोळेकर, रामभाऊ कोळेकर, शिपाई खंडेराव कोकरे, सुनील झेंडे, अंगणवाडी सेविका सिंधुताई कोकरे, मदतनीस देवई बंड, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांना खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.
close