shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिसेगाव जि. प. शाळेची विद्यार्थीनी अर्पिता चाटे एम टी एस परीक्षेत बीड जिल्ह्यात प्रथम..!



प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

एम टी एस ओलंपियाड महाराष्ट्र शासन मान्य राज्यस्तरीय ओलंपियाड परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पीसेगाव या शाळेची विद्यार्थिनी कु. चाटे अर्पिता महेंद्र हिने विशेष प्राविण्यसह गुणवत्ता  यादीत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर महाराष्ट्रातुन तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिसेगावचे मुख्याध्यापक राजगिरे सर , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुंजाबा करपे,केज बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर,सरपंच हनुमंत नेहरकर ,उप सरपंच कोमल सूर्यवंशी , केज व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष महादेव सूर्यवंशी , महेंद्र चाटे ,अशोक नेहरकर, टिके सर , व सर्व समिती सदस्य , व सर्व गावकरी यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या . 

तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
close