कृष्णा बँकेची शिरूर कासार येथे विस्तारीत ६ वी शाखा लवकरच कार्यान्वित होणार..
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केजच्या कृष्णा अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेची वाटचाल ग्राहकांच्या विश्वासहर्ते बरोबर ईतरांना दिशा देणारी आसून कृष्णा अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेचे प्रत्येक पाऊल सामान्य जनतेच्या हितासाठी असल्याचे प्रतिपादन आ.नमिता मुंदडा यांनी कृष्णा बँकेच्या २६ व्या सर्वसाधाण सभेच्या प्रसंगी बोलताना केले आहे.
केज शहरातील कृष्णा अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेची २६ वी सर्वसाधारण सभा व संस्थापक अध्यक्ष तथा माजी जि.प.उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे व सौ कृष्णाताई मुंडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रूग्णालय आंबेजोगाई यांच्या संयुक्त विद्यामानाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन सोमवारी दु.१ वा.रामकृष्णगड आंबळाचे बरड (सारूळ) येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केजच्या आ.नमिता मुंदडा तर माजी जि.प.उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.यावेळी ह.भ.प त्रिविक्रमानंद शास्त्री इंदूवासिनी,ह.भ.प माऊली महाराज बरडकर,ह.भ.प श्रीराम महाराज विडेकर,ह.भ.प केशव महाराज टाकळीकर,ह.भ.प गणेश महाराज मुंडे यांनी आशिर्वादपर मनोगत व्यक्त करत बँकेच्या वाटचालीस आशिर्वाद दिले.कृष्णा बँकेने मागील कार्यकाळात अनेक आव्हाणे पेलले आसून ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर बँकेने गेली २६ वर्ष यशस्वी वाटचाल केली आहे. येणाऱ्या काळात देखिल बँकने अधिक जोमाने काम करत सर्वसामान्यांशी जोडलेली नाते कायम ठेवले आसून याचाच हा प्रत्यय असल्याचे प्रतिपादन आ.नमिता मुंदडा यांनी सर्वसाधाण सभेत बोलताना केले आहे.
प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे,जि.प.सदस्य भारत काळे,जि.प.सदस्य अशोक लोढा,जि.प.सदस्य राणा डोईफोडे,जिल्हा सरचिटणीस देविदास नागरगोजे,जेष्ठ नेते मुरलीधर ढाकणे,शिवसेना नेते बप्पासाहेब घुगे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल गलांडे,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान केदार,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी,शरद इंगळे,माजी पंचायत समिती सदस्य अशोक चाळक,बी.एस ठोंबरे,पी,डी.मुरकुटे गुरूजी,अॅड.डी.एल नागरगोजे,सरपंच सुशील जाधव,सरपंच रंजीत बिक्कड,सरपंच दत्ता कोरडे,सरपंच अरुण चाटे,सरपंच रामराजे तांबडे,सरपंच बाळासाहेब केदार,सरपंच बाळासाहेब कराड,सरपंच विलास जोगदंड,सरपंच नामदेव आंधळे,सरपंच प्रशांत केदार,माजी सरपंच महादेव जाधव,माजी सरपंच अशोक गायकवाड,चेअरमन अंकुश कलाने,माजी सरपंच विठ्ठल मुंडे,माजी सरपंच श्रीहरी धस,मुकादम ज्योतीराम आंधळे,अशोक वाघमारे,बाबासाहेब मुळे,माजी सरपंच रघुनाथराव बारगजे,डाॅ.धनराज पवार यांची उपस्थिती होती.
दरम्यान बँकेचे चेअरमण तथा जि.प.सदस्य विजयकांत मुंडे,देवगावचे सरपंच अतुल मुंडे,प्रा.सौ.माधुरीताई मुंडे,रूपालीताई मुंडे,बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी वसुदेव मुंडे,शिवरामपुरी पतसंस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिता पवार यांनी उपस्थितांचा यथोचित सन्मान केला.यावेळी बँकेचे सर्व संचालक मंडळ व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक कन्हेरे सर यांनी केले तर निजाम खतिब यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले..

