श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयांमध्ये विशेष नवमतदार नोंदणी अभियान.
इंदापूर प्रतिनिधी:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ राष्ट्रीय सेवा योजना व श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा व केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष नवमतदार नोंदणी अभियानाचे* आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल हाजगुडे ,तलाठी बावडा व राजाभाऊ पिसाळ तलाठी सराटी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.सदर महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असून त्यांची शंभर टक्के मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे .आपल्या महाविद्यालयातील प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांची नोंद मतदार यादी मध्ये व्हावी. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.लहू वावरे म्हणाले नवयुवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी विशेष नवमतदार नोंदणी अभियान या उपक्रमाचे महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. पात्र नवयुवक तरुणांनी ज्यांचे वय ०१ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्ष अशा सर्व विद्यार्थ्यांनी मतदार फॉर्म भरून पुढील वर्षी २०२४ मध्ये होऊ घातलेल्या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपण सर्वांनी मतदान फॉर्म भरून द्यावेत असे आव्हान करण्यात आले.
डॉ.तयाजी लोंढे सर यांनी विद्यार्थ्याकडून मतदार फॉर्म भरून घेतले. महाविद्यालयातील एकूण १०४ विद्यार्थ्यांनी मतदार फॉर्म भरले. सूत्रसंचालन कु.प्रांजली जाधव हिने केले.आभार चेतन काटे यांनी मानले.सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , उपाध्यक्ष मनोज पाटील, संचालक उदयसिंह पाटील, सचिव किरणराव पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले

