shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उंदिरगांव ते नेपाळ गंगासागर, जगन्नाथपुरी सहलीस माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या शुभेच्छा..

बी.आर.चेडे - शिरसगांव
सन २००९ या वर्षापासून या परिसरातील व श्रीरामपूर तालुक्यातील गरीब,शेतकरी मजूर असतात शेतकरी सामान्य कुटुंबातील लोक असतात व कष्टकरी लोक यांना आतापर्यंत ना  नफा ना तोटा या धर्तीवर ३० ते ३५ सहली भारतामध्ये कन्याकुमारी ते वैष्णवदेवी, जगन्नाथपुरी ते रामेश्वर,अशा पद्धतीने काढल्या आहेत असे या सहलीचे सूत्रधार अशोक सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश पा.गलांडे यांनी सांगितले.या सहलीचे अल्पदरात १४ हजार रु.मध्ये नियोजन केले आहे. त्यात सर्व जेवण,नाश्ता सुविधा आहेत, या सर्व यात्रेकरूना उंदिरगांव येथील ग्रामस्थांसह अशोक संचालक विरेश गलांडे, बाळासाहेब नाईक, सुदाम औताडे,सुरेश शिंदे,मार्केट कमिटी संचालक राजेंद्र पाउलबुद्धे, दिलीपराव नाईक, भगवान ताके,अशोक गलांडे, हरिभाऊ पटारे,तुकाराम सलालकर,राजेंद्र गिर्हे,गोरख भालदंड,आदींनी शुभेच्छा दिल्या.

त्याचप्रमाणे अशोकनगर उद्योग समूह येथे सर्व ३ बसेस आल्यावर त्यांना अशोक कारखाना चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे,माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे,सचिन गुजर,,माजी चेअरमन सुरेश पा,गलांडे, संचालक राजेंद्र पाउलबुद्धे,सुरेश शिंदे,आदी मान्यवर व ग्रामस्थांनी १५० यात्रेकरूना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या..तेथून श्री योगीराज गंगागीरीजी महाराज ट्राव्हल्स रवाना झाल्या, या प्रवासात नेपाल, गंगासागर, जगन्नाथपुरी जाताना अनेक धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या जातील.व दि २३ रोजी नर्मदा दर्शन,ओंकारेश्वर मुक्काम २४ रोजी उज्जैन, खजुराहो, जगप्रसिद्ध लेणी व २६ रोजी मुक्काम,दि २७ चित्रकुट,त्रिवेणी संगम,काशी विश्वेश्वर,व २७ ला काशी मुक्काम,दि.२९ अयोध्या व मुक्काम, दि. ३० नेपाळव गोरखपूर,मुक्काम,दि १ पशुपतीनाथ व काठमांडू मुक्काम,.दि ३ पितृगया,भगवान बुद्ध मंदिर,हावडा ब्रिज,गंगासागर स्नान,सूर्यमंदिर व लेणी,आदी व दि. १० जगन्नाथपुरी मुक्काम,दि. १३ गजानन महाराज,शेगाव व मुक्काम दि. १४ रोजी श्रीरामपूर प्रवास सांगता.होईल असे संयोजक सुरेश पा. गलांडे यांनी सांगितले.


*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close