shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ. स्नेहा भूयार यांच्या रुपाने आय एम ए यवतमाळ शाखेला लाभल्या सुसंस्कृत,अभ्यासू व अनुभवसंपन्न महिला अध्यक्षा - डॉ. रविंद्र कुटे


प्रतिनिधी अक्षय तोटावार - यवतमाळ
आय एम ए यवतमाळ शाखेचा पदग्रहण समारंभ १७ सप्टेंबेर रोजी संपन्न झाला. या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.):चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.रवींद्र कुटे हे संबोधित करत होते. यवतमाळ शाखेला दोन वेळा राष्ट्रीय परिषद व कार्यकारणी परिषद यशस्वीपणे घेतली असून ही एक कार्यक्षम महत्वपूर्ण शाखा आहे, वर्ल्ड ऐथ़्‌ले᠎̮टिक्‍स असोसिएशन द्वारे मेरेथॉन व दुरपल्याची शर्यत मान्यता प्राप्त घेऊन २००० स्पर्धकान बरोबर घेऊन धावायला लावणारी महाराष्ट्रातील एक अनोखा विक्रम नोंदवणारी शाखा आहे.  

डॉ. स्नेह भुयार या बी जे मेडिकल कॉलेज पुणे येथील १९८३ च्या अल्यूमनी असून अनेक पदावर त्यांनी महत्वपूर्ण कामे केली आहे. गेली ३० वर्षांपासून यवतमाळ या ठिकाणी स्त्री रोग प्रसूती, लेप्रोस्कोपिक तज्ञ वंधत्व निवारण यावर सध्या त्या काम करत असून अनेक पदावर त्यांनी कामे केले आहे.

आनंदीबाई जोशी राष्ट्रीय अवॉर्ड, लोकमत हेल्थकेअर एक्‌सलन्‍स्‌ अवॉर्ड, डॉ. दुरू शाह सेवा पुरस्काराने त्या सन्मानित असून त्यांचाद्वारे आय एम ए यवतमाळ शाखेने अभ्यासू, व्यासंगी, अनुभव संपन्न प्रगल्भ महिला अध्यक्षा यांचे नेतृत्व मिळले असून त्यांचा आय एम ए ला अभिमान आहे असे गौरवद्वार आय एम ए महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांनी कढले. 
यावेळी सचिव डॉ. सागर झोपटे, डॉ. स्नेहा राठोड खजिनदार पदी डॉ. स्वप्नील मानकर व डॉ. स्वप्नील मादनकर तसेच इतर पदधिकारी यांना डॉ. रवींद्र कुटे यांनी शपत दिली. 

डॉ. टी. सी. राठोड, डॉ. दिनेश ठाकरे, डॉ. संजय रत्नपारखी, डॉ. शरद राखुंडे, डॉ. संजय जोशी,  डॉ. प्रशांत कासारे, डॉ. दीपक सवालाखे डॉ. राजेंद्र भुयार यांची प्रमुख उपस्थिती होती.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close