shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी आ.स्व.भास्करराव गलांडे पा.यांचे खंडकरी शेतकरी व शैक्षणिक क्षेञासाठी योगदानः माजी आ.भानुदास मुरकुटे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्याचे माजी आमदार तसेच अशोक कारखान्याचे माजी चेअरमन स्व.भास्करराव गलांडे पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह खंडकरी शेतक-यांसाठी लढा दिला.अनेक चळवळी,आंदोलने केली.प्रसंगी तुरुंगवास भोगला.कारखाना माध्यामातून त्यांनी शेतकऱ्यांच्या विकास साधण्याचे काम केले. सामाजिक कामाला प्राधान्य दिले. महाविद्यालये ,अनेक गावांत रयत संस्थेचे हायस्कूल्स उभारली. सभासद शेतक-यांच्या मुलांना शैक्षणिक फी भरण्यासाठी अर्थसहाय्य केले.त्याचा मी देखिल लाभार्थी आहे.त्यांचे सहकार्यामुळेच मी सी.ए.पर्यंत शिक्षण घेवू शकलो.त्यांनी विधानसभेची उमेदवारी नाकारुन मला उमेदवारी देवून आमदार केले.त्यांचेमुळेच मी आमदार झालो.मला पस्तीस वर्षे कारखान्याची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. अशा शब्दांत अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी स्व.गलांडे पा. यांच्या स्मृतीला उजाळा दिला.

माजी आमदार व अशोक कारखान्याचे माजी चेअरमन स्व.भास्करराव पा.गलांडे यांचे पुण्यतिथीनिमित्त अशोक महाविद्यालयात आयोजित वकृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे हस्ते व व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.याप्रसंगी श्री मुरकुटे बोलत होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे,माजी नगराध्यक्ष सौ.इंदुताई डावखर,लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ,काशिनाथ गोराणे,सौ.शालिनीताई कोलते,संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे,भाऊसाहेब हळनोर, संचालक भाऊसाहेब उंडे, सोपानराव राऊत,बाबासाहेब आदिक,विरेश गलांडे,आदिनाथ झुराळे,अमोल कोकणे,संस्थेचे उपाध्यक्ष योगेश विटनोर,संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे , अॕड.सुभाष चौधरी, शिवाजी मुठे,रोहन डावखर,गीताराम खरात,अशोक पारखे ,प्राचार्य संपत देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री.सुनिल गलांडे म्हणाले की,स्व.भास्करराव गलांडे यांनी पन्नास वर्षे राजकारण व त्या माध्यमातून समाजकारण केले.तरी स्व.गलांडे विस्मरणात गेले.माञ माजी आ.मुरकुटे यांनी तेवीस वर्षे वकृत्व स्पर्धेव्दारे त्यांच्या स्मृती अविरत ठेवल्या, असे ते म्हणाले. प्रास्ताविकात प्र.प्राचार्य सौ.सुनिताताई गायकवाड यांनी स्व.गलांडे यांच्या कार्याचा गौरव केला.त्या म्हणाल्या की,स्व.गलांडे यांनी शेतकऱ्यांसाठी व शैक्षणिक क्षेञासाठी महत्त्वाचे योगदान दिले.अनेक ज्ञानमंदिरे उभी केली.त्याची प्रेरणा घेवूनच माजी आ.मुरकुटे यांनी प्रेरणा घेवून अशोक शैक्षणिक संकुल उभे केले.त्यामुळे हजारो सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली,असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या प्रा.सुधीर शेरकर यांच्या अध्यक्षीय सुचनेस प्रा.कल्याणी साळुंकेंनी अनुमोदन दिले.सूञसंचलन प्रा.दिलिप खंडागळे यांनी केले तर प्रा.सुयोग थोरात यांनी आभार मानले.

स्पर्धेत प्रणाली पाटील, प्रथम (बेलापूर महाविद्यालय),लक्ष्मण कचरे ,व्दितिय(बेलापूर महाविद्यालय),श्रुती बोरस्ते, तृतिय (एच.पी.टी काॕलेज, नाशिक),वैष्णवी माकोणे, उत्तेजनार्थ (बोरावके, महाविद्यालय, श्रीरामपूर) कार्तिक झेंडे, उत्तेजनार्थ (यशवत लाॕ काॕलेज,पुणे).,अंजली अंगारखे (अशोक महाविद्यालय, अशोकनगर ) या स्पर्धकांनी पारितोषिके मिळविली. परिक्षक म्हणून शिवराज आनंदकर, महादेव गर्जे व सौ. वर्षा सोलापूरकर यांनी काम पाहिले.तर प्रा.दिलिप खंडागळे यांनी स्पर्धा संयोजकाची जबाबदारी पार पाडली. प्रारंभी स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे यांचे अध्यक्षतेखाली तसेच माजी चेअरमन सुरेश गलांडे, व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे ,संस्थेचे उपाध्यक्ष योगेश विटनोर, काशिनाथ गोराणे,सहसचिव भास्कर खंडागळे आदिंच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्व.गलांडे पा.यांचे प्रतिमेचे पूजन करुन झाले.त्यानंतर सुरेश पा. गलांडे,काशिनाथ गोराणेबाबा यांची स्व.गलांडे यांच्या जीवनावर यथोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यलयाच्या प्र.प्राचार्या सौ. सुनिताताई गायकवाड यांनी केले. यावेळी संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे , पाॕलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे,आयडीअल स्कूलचे प्राचार्य रईस शेख उपस्थित होते.प्रा.कैलास जाधव यांनी मांडलेल्या अध्यक्षिय सुचनेस प्रा.पायल सुराणा यांनी अनुमोदन दिले.सूञसंचलन प्रा.ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले तर प्रा.रविन्द्र वारुळे यांनी आभार आभार मानले. कार्यक्रमास, प्राध्यापक ,शिक्षणेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
9561174111
close