shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एकता फौंडेशन ट्रस्ट बांदलवस्तीत गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा.

एकता फौंडेशन ट्रस्ट बांदलवस्तीत गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा.
शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी: कुरुळी(ता- खेड) जिल्हा पुणे येथील एकता फौंडेशन ट्रस्ट बांदलवस्तीत गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या गणेशोत्सवातील  गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक मध्ये एकता फौंडेशन ट्रस्टने डी. जे. न लावता या गावातील व परिसरातील वारकरी सांप्रदायिक मंडळीच्या भजन टाळ मृदंगाच्या निनादांमध्ये सुंदर अशा पद्धतीने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक एक आदर्श मिरवणूक या परिसरात ठरली असल्याचे दिसून येत आहे. १० दिवसाच्या कालावधीत एकता फौंडेशनचे सर्व सभासद आणि बांदलवस्ती वरील सर्व गणेश भक्तांनी ही १० दिवस मोलाचं सहकार्य केले त्याबद्दल ट्रस्ट च्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले 
ट्रस्ट च्या वतीने १० दिवसांत लहान मुले, मुली आणि बंधू भगिनींसाठी  वेगवेगळ्या करमणुकीचा व सामाजिक उपक्रमाचे आयोजन  छान असे करण्यात आले होते. या कार्यक्रमात विजयी मिळविलेल्या सहकार्यांना छोट्या खानी गिफ्ट देऊन त्यांचा ही सन्मान करण्यात आला.
एकता फौंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष   वाजीद शेख  यांनी सर्व गणेश भक्तांच आभार मानले. आज दिली तशीच या पुढील काळात ही अशीच साथ आणि सहकार्य मिळावे अशी विनंती केली.
यावेळी एकता फौंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष वाजीद शेख,   उपाध्यक्ष प्रवीण निकम,खजिनदार युवराज भोसले सचिव ज्ञानदेव शिंदे,सदस्य स्वप्नील मेदनकर, सदस्य सोपान मोरे,सदस्य महेंद्र सिंग प्रजापती,सदस्य श्रीकांत अंबुरे,सदस्य भरत रसाळ,सदस्य प्रकाश दाभाडे सदस्य योगेश मोठे , ट्रस्ट चे आधारस्तंभ
सूर्यकांत खटिंग, युवराज भोसले,प्रवीण गायकवाड,निलेश बोराटे,प्रणव झिंजुर्गे,दिलीप मेदनकर
कालिदास मुर्हे,साईनाथ मुर्हे,महेश मुर्हे 
आणि एकता फौंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशाली गव्हाळे आणि कु अश्विनी चौरे आणि ट्रस्ट चे कार्यकारणी सर्व सदस्य आण्ण कानडे,आदिनाथ कांबळे,बाळासाहेब नीलकंठ,आण्णा गाढवे,मंगलदास मारनुरे,सतीश टकले,राजेंद्र आणवणे,शेखर शेमाडे,दत्तात्रय निटूरे,अजय चौरे,किरण हरगुडे,श्याम गव्हाळे,मुकुंद जोगदंड आणि उपस्थित सर्व नागरिक सर्व सभासद सदस्य या दहा दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते.
close