श्रीरामपूर प्रतिनिधी:
इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) श्रीरामपूर शाखेने १९९८ साली डॉक्टरामधे आरोग्य विषयक फिटनेस चळवळ सुरु केलेल्या मॅरोथॉन ने २५ वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले.
डॉ. राजेंद्र चौधरी आणि डॉ. राजाराम जोंधळे यांच्या प्रेरणेतून दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येते, त्यामध्ये सदस्य, लहान मुले व त्यांचे कुटुंबीय तसेच STMA व IDA यांचे सदस्य असे सर्व उत्साहाने सहभागी होतात. या वर्षी देखील लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वानी भाग घेऊन उत्सफुर्तपणे प्रतिसाद दिला.
या मॅरोथॉन ला प्रमुख पाहुणे म्हणून आयरन मैन श्रो जस्मित वाधवा यांची उपस्थिति लाभली. त्यांनी मॅरोथॉन शर्यत पूर्वी वार्मिंगअप व शर्यत नंतर स्ट्रेचिंग एक्सरसाईज यांचे महत्त्व विषेध केले, त्याचबरोबर आहार विषयक सखोल मार्गदर्शन करुन उपस्थितीतांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सौ. वधवा यांनी फलाहार व घरगुती पाककृति या बाबत माहिती दिली.
आय एम.ए.चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ रविंद्र कुटे यांनी रौप्य मोहोत्सव मॅरोथॉनबद्दल आय एम ए श्रीरामपूर पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले तसेच तणाव मुक्तिसाठी खेळ हा छंद जोपासणे महत्वाचे आहे हे पटवून दिले.
डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. संकेत मुंदडा, डॉ. राम कुकरेजा यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. डॉ. संकेत मुंदडा यांनी प्रस्ताविक करुन पुढील उपक्रमांची माहिती दिली. डॉ. राम कुकरेजा यांनी स्पर्धेची नियमावली समजावून सांगितली व शेवटी आभार व्यक्त केले.
यावेळी IMA, STMA व IDA श्रीरामपुर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111