निमसाखर येथे जोपासली हिंदू मुस्लिम बांधवांनी समानतेची बांधिलकी .
ईद- ए- मिलाद व श्री गणेश अनंत चतुर्दशी दिवसी मुस्लीम बांधवांनी सर्व गणेश मंडळांना प्रत्येकी दोन कॅरेट केळी फळे केली वाटप .
इंदापूर प्रतिनिधि: निमसाखर (ता- इंदापूर) येथे दिनांक २८ सप्टेंबर २०२३ ईद- ए- मिलाद व श्री गणेश अनंत चतुर्दशी योगायोगाने एकाच दिवसी आली होती. याचे औचित्य साधून निमसाखर येथील ह -टिपू- सुलतान यंग सर्कलचे युवक तसेच गावातील सर्व मुस्लिम युवक यांनी निमसाखर येथील सर्व गणेश मंडळांना प्रत्येकी दोन कॅरेट केळी फळे वाटप केली व गावातील सर्व गणेश भक्त तसेच हिंदू बांधवांना श्री गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
निमसाखर मध्ये नेहमीच हिंदू मुस्लिम बांधव एकत्र सण साजरे करतात व हिंदू मुस्लिम समानतेची बांधिलकी जोपासतात. यावेळी हिंदू बांधवांनी ही सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या.
सदर वेळी मुस्लिम जमात निमसाखरचे सर्व जेष्ठ तसेच असलम शेख, मोहिनीन मुलाणी, वाहिद मुलाणी, तूफेल मुलाणी, निमसाखर ग्रामपंचायतचे सदस्य जाकिर मुलाणी, नबीलाल शेख, जुनेद डांगे, तौकीप बक्षी, सोहेल शेख, फिरोज शेख, सुरज मंजुळकर ,पापा शेख, अख्तर पठाण, तय्यब तांबोळी , हसन मुलाणी, राजू मुलाणी, साहिल मुलाणी इत्यादी उपस्थित होते अशी माहिती मिराज मुलाणी यांनी सांगितली.