shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री.संत सावता माळी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने २०२४ च्या गणेश उत्सवामध्ये इंदापूर शहरात होणार गौरी सजावट स्पर्धा - पांडुरंग ( तात्या) शिंदे.

श्री.संत सावता माळी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने २०२४ च्या गणेश उत्सवामध्ये इंदापूर शहरात होणार गौरी सजावट स्पर्धा - पांडुरंग ( तात्या) शिंदे.

श्री संत सावता माळी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण व गणपती महाआरतीची आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: श्री संत सावता माळी गणेश उत्सव मंडळ महात्मा फुले चौक माळी गल्ली इंदापूर येथे गणेश उत्सवानिमित्त गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण व गणपती महाआरतीची आयोजन बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, मंडळाचे मार्गदर्शक पांडुरंग (तात्या) शिंदे ,   पांडुरंग बंडू शिंदे, बळीराम हरिभाऊ शिंदे,दादाराव देविदास राऊत,रामचंद्र भगवान शिंदे, दिगंबर सोपान राऊत, कांतीलाल दगडू शिंदे, पांडुरंग मारुती शिंदे, बाळू ज्ञानदेव शिंदे, दत्तात्रेय नारायण शिंदे ,अरविंद एकनाथ शिंदे,  दत्तात्रय भगवान शिंदे, संतोष बळीराम शिंदे, विकास राऊत, शेखर राऊत, विलास फोंडे, दिलीप दत्तात्रेय भिंगारे, प्रकाश हिंगमिरे, अंबादास चव्हाण, नंदकुमार खरवडे, मयूर शिंदे ,पांडुरंग दामू राऊत, मंडळाचे अध्यक्ष राहुल राऊत, उपाध्यक्ष दादा शिंदे, खजिनदार मनोज भिंगारे ,कार्याध्यक्ष गौरव राऊत ,सहकार्याध्यक्ष शिवदास शिंदे ,सचिव किरण शिंदे ,सजावट प्रमुख अक्षय शिंदे व इतर मंडळातील कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गौरी सजावट स्पर्धेमध्ये मंडळातील १०१ स्पर्धकांनी भाग घेतला यामध्ये  अश्विनी पोतदार व रोहिणी पोतदार यांनी प्रथम क्रमांकची गॅस शेगडी व गणपतीची मूर्तीबक्षीस मिळवली. द्वितीय क्रमांक बाउल सेट व गणपतीची मूर्ती नेहा खरवडे. आणि श्रद्धा खरवडे , तृतीय क्रमांक पोळी डब्बा रुपा शिंदे आणि तेजस शिंदे , चतुर्थ क्रमांक वॉटर जार छाया राऊतआणि अस्मिता राऊत, पाचवा क्रमांक इडली पात्र लक्ष्मी फोंडे आणि अश्विनी फोंडे, सहावा क्रमांक कप बशी सेट मंदाकिनी शिंदेआणि संजीवनी शिंदे, सातवा क्रमांक ज्वेलरी बॉक्स  वर्षा भराटे आणि पप्पू भराटे,आठवा क्रमांक  ड्रायफूट बॉक्सवर्षा शिंदे आणि अनिल शिंदे, नववा क्रमांक समई जयश्री हिंगमिरे आणि प्रकाश हिंगमिरे तर उत्तेजनार्थ बक्षीस गरम चपाती ठेवण्याचा डब्बा पाच जणांना देण्यात आला त्यामध्ये सोनाली शिंदे, कल्पना शिंदे, शैला शिंदे ,सारिका राऊत ,अश्विनी शिंदे या सर्व क्रमांकाचे बक्षीस वितरण इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, मार्गदर्शक पांडुरंग तात्या शिंदे व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावर्षी गौरी सजावट स्पर्धा महात्मा फुले चौक माळी गल्ली पूर्ती मर्यादित होती. परंतु येणाऱ्या २०२४ च्या गणेश उत्सवामध्ये ही गौरी सजावट स्पर्धा इंदापूर शहरासाठी या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणार असल्याचे मंडळाचे सर्वेसर्वा पांडुरंग (तात्या) शिंदे यांनी सांगितले.
close