कुऱ्हा : आज 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस या दिवसाचे महत्व किती आहे आणी *निरोगी हृदय* या बाबत आज तळागाळापर्यंत जनजागृती होऊन हृदय निरोगी राहण्यासाठी काय करायला पाहिजे याची सर्वं माहिती प्रत्येकाला मिळणे / असणे गरजेचे आहे.
धावपळीच्या जीवनात आज हृदयविकार ( अटॅक ) चे प्रमाण खूप वाढले असून हसत-खेळत चालता-बोलता माणसाचा हृदयविकाराने मुर्त्यू येत आहे.
नियोजनशून्य जीवनशैली आणी अमाप अपेक्षा या कारणाने माणुस स्वतः स्वतःचे जीवन कमी करून घेत आहे.
खालील पंचसूत्रचा जीवनात अवलंब करून आपण आपले हृदय निरोगी ठेऊ शकतो.
1) संतुलित आहारासह वेळेवर जेवण
2) पूर्ण आठ तास शांत झोप
3) नियमित व्यायाम / योगासना 4) तणाव विरहित जीवन
5) धूम्रपान न करता आहारात ताजे फळे पालेभाज्या जास्त प्रमाणात खाणे.
वरील नियमांचे काटेकोर पणे पालन केल्यास आपले हृदय निरोगी राहण्यास हातभार लागेल.
म्हूणन प्रत्येक घरातील सुशिक्षित व्यक्तीने आपल्या घरातील सर्वं सदस्यांना या पंचसूत्राचा अवलंब करण्यास उत्स्फूर्त करून संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवावे.
श्री.आर.टी.आटोळे
जिल्हा हिवताप कार्यालय
अमरावती