खेड:-
रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक व राज्याचे मा. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बहुमोल अशी साथ मिळत असून शेतकरी हक्काने त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जात आहे. अत्यंत आपुलकीने खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करीत असतात साथ देत असतात.
खेड तालुका रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी नुकतीच सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर जि. सांगली येथील निवासस्थानी भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न बाबत सविस्तर चर्चा केली.
तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांमध्ये भामा आसखेड, चासकमान प्रकल्पांतर्गत चाळीस(४०) वर्षांपूर्वी पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के काढून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे आणि खेड सेझ मधील शेतकऱ्याना १५% परतावा प्रश्नासंदर्भात शासनाकडून चांगला मोबदला मिळवून देणे , इतर प्रश्न याबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली.
लवकरच खेड तालुक्यातील प्रश्नांसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर चर्चा करून बैठकीचे नियोजन केले जाईल व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पाठपुरावा करेल खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही! असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.
खेड तालुक्यातील शेतकऱ्यांशी सदाभाऊ खोत यांची वेगळी नाळ जुळली असून अत्यंत आपुलकीचे, जिव्हाळ्याचे, संबंध निर्माण झाले आहेत.
सदाभाऊ खोत यांनी यांनी खेड तालुका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाहुणचार करून स्वतःच्या गाडीतून कोल्हापूर येथील पन्हाळा, ज्योतिबा दर्शन, एकत्रित करून
शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांबरोबर पूर्ण दिवस दिला. शेतकऱ्यांबरोबर आनंदी वातावरणात मुक्त चर्चा केली त्यामुळे शेतकरी भारावून गेले असून सदाभाऊ खोत खरोखर शेतकऱ्यांचा नेते ,कैवारी, आहेत अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.
खेड तालुक्यातील रयत क्रांती संघटनेला सदाभाऊ खोत यांची चांगले बळ मिळत असून त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत आहे याचे समाधान शेतकऱ्यांना नेहमी वाटते. यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सदाभाऊ खोत यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल व प्रश्न मार्गी लावले जातील असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आशावाद व्यक्त केला आहे.
सदाभाऊ खोत यांच्या भेटीसाठी खेड तालुका रयत क्रांती संघटनेचे गजानन गांडेकर, सुभाष पवळे, विठ्ठल शेठआरगडे, विश्वासपोटवडे, मिनीनाथ साळुंखे हे उपस्थित होते.