shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथील विक्रम राव मुंडे पोद्दार लर्न स्कूल चे विविध शालेय क्रीडा प्रकारात सुयश!!

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
जिल्हा क्रीडा अधिकारी बीड व पंचायत समिती केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विविध क्रीडा प्रकारात विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले.
दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल केज येथे झालेल्या व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारात वयोगट 14 वर्षाचा मुलीच्या संघाने दुसरा क्रमांक पटकावला.
 
दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी साने गुरुजी निवासी शाळा ,केज येथे झालेल्या योगासने या क्रीडा प्रकारात शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा काळे वयोगट १४ हिची बीड येथे होणारा जिल्हास्तरीय योगासने स्पर्धेसाठी निवड झाली. 

दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक विद्यालय, 
आनंदगाव सारणी येथे बुद्धिबळ स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी कुमार ऋषभ थोरात इयत्ता , कुमारी काव्य समुद्रे इयत्ता , व कुमारी ऋतुजा थोरात सहावी या तीनही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.

या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका सौ आसरा अंकुरवाड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री विक्रमराव बप्पा मुंडे साहेब, शाळेचे उपाध्यक्ष श्री विजयकांत भैय्या मुंडे साहेब, सचिव श्री अतुल दादा मुंडे साहेब, शाळेच्या संचालिका सौ माधुरीताई मुंडे मॅडम, प्राचार्य श्री आनंद मरळगोईकर सर, प्रशासकीय अधिकारी श्री डॉ.दीपक सांजोरे सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
close