प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
14 सप्टेंबर आज रोजी साने गुरुजी निवासी विद्यालयात केज तालुकास्तरीय योगा स्पर्धा संपन्न झाल्या . या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अड. उद्धवरावजी कराड साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक केज तालुका क्रीडा संयोजक विनोद गुंड यांनी केले तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्राचार्य डॉ .कविता गित्ते उपस्थित होत्या.या स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदवून तालुका स्पर्धा यशस्वी केली.
यावेळी उद्घाटन पर भाषणात नवीन शैक्षणिक धोरणात ज्याला जे जे पाहिजे ते ते देण्याची सुविधा असल्याचे सांगून ज्याच्याकडे जी कला आहे ती त्याने अवगत केली पाहिजे व त्या कलेला वाव दिला पाहिजे असे संबोधन केले. क्रीडा क्षेत्रात केज चा नावलौकिक असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच क्रीडा संयोजक विनोद गुंड यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे देखील त्यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच केज तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडू विद्यार्थ्यांनी व शाळांनी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .त्याचबरोबर योगा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य असते आणि ते चैतन्य दिवसभर टिकून राहते.आरोग्यम् धनसंपदा ॔ याप्रमाणे आरोग्य असेल तर बाकीच्या सर्वच गोष्टी आहेत असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद गुंड यांनी केले . तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती कांदे मॅडम यांनी मांडले या कार्यक्रमास क्रीडा शिक्षक श्री सानप सर , श्री घुले सर , नेहरकर मॅडम , गिरी मॅडम,गिरी सर व विद्यार्थी उपस्थित होते.

