वालचंदनगर येथे हर्षवर्धनजी पाटील दहीहंडी चषकचे आयोजन.
दहीहंडी कार्यक्रमात राजवर्धन पाटील यांच्यासह अनेक तरुणांनी केला आनंदउत्सवात जल्लोष.
इंदापूर प्रतिनिधी: वालचंदनगर येथे सालाबादप्रमाणे यंदाही भाजप नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नावाने हर्षवर्धनजी पाटील दहीहंडी चषकचे आयोजन (ता.१० सप्टेंबर) करण्यात आले होते. या चषकाचे मानकरी अण्णाभाऊ साठे दहीहंडी संघ बारामती हे ठरले.
ह्या वेळी प्रथम जंक्शन येथून भाजपचे कोअर कमिटी प्रमुख व युवा नेतृत्व राजवर्धन पाटील यांची भव्य बाईक व चार चाकी रॅली काढण्यात आली.जवळपास ५०० बाइक व २०० चार चाकी सदरच्या बाईक रॅली मध्ये सहभागी झाल्या होत्या. या रॅलीचे युवा मोर्चा उपाध्यक्ष आकाश (रँडी) भोसले यांनी आयोजित केली होते. दहीहंडी कार्यक्रमासाठी आकर्षक पद्धतीने लाईट सिस्टीम होती याबद्दल अनेक करून व बालकांनी जल्लोष करीत आनंद उत्सव साजरा केला. या कार्यक्रमांमध्ये निरा भिमा कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनीही बरोबर जल्लोष केला.
दहीहंडी उत्सवाचे आयोजन आकाश भोसले, पप्पू कलानी, मुन्नाभाई झेंडे, रणगाव उपसरपंच रोहित गायकवाड, इंदापूर तालुका सोशल मीडिया उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे यांनी यांनी केले होते.

