shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै. सूर्यकांत मारूतराव रणवरे यांची 87 वी जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कै. सूर्यकांत मारूतराव रणवरे यांची 87 वी जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
इंदापूर प्रतिनिधि:निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ,तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी स्वामी विवेकानंद हॉलमध्ये शिक्षण महर्षी के. सूर्यकांत मारूतराव रणवरे यांची 87 वी जयंती उत्साहात पार पडली. या जयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी ग्लोबल शेपर्स कम्युनिटी हब बारामतीच्या प्रमुख देवयानी रणजित पवार, पुष्कराज निंबाळकर ,शंतनू जगताप ,भारावी मुलमुले ,माऊली खाडे, अखिल सूर्यवंशी, शेखर जाधव ,खडीजा कायमखानी, सौरभ काटे, ओमकार कोकरे, हतीम पत्थरवाल, पांडुरंग अडसूळ, हर्षल रणवरे ,निकिता सोनुने ,अक्षय गीतांजली प्रक्षाळे यशवंत विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार रणवरे ,संस्था उपाध्यक्ष संजय रणवरे, संस्था सचिव धनंजय रणवरे ,प्राचार्य चंद्रकांत रणवरे, पर्यवेक्षक मधुकर खरात, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे ,सचिन रणवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काळे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी देवयानी रणजित पवार,संस्था सचिव धनंजय रणवरे , प्राचार्य चंद्रकांत रणवरे, अनुराधा रणवरे, वैभव हणमंते, प्रमोद चव्हाण, यांनी सुर्यकांत आप्पा ची सामाजिक , शेती विषयक,राजकीय, शैक्षणिक कार्याची माहिती  दिली . ग्लोबल शेपर्स कम्युनिटी हब बारामतीच्या वतीने वृक्षारोपण केले व किशोर वयातील मुलींना आरोग्य विषयक माहिती दिली संस्थेचे वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे नियोजन संस्कृतीक विभागाने केले तर सूत्रसंचालन आजिनाथ मलगुंडे यांनी केले.
close