डॉ. कदम हॉस्पिटल तर्फे पडस्थळ येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
इंदापूर प्रतिनिधि: आज दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी मौजे पडस्थळ,ता. इंदापूर येथे संजीवनी सोशल फाउंडेशन व डॉ. कदम बाल व महिला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलां व मुलींसाठी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सामान्यतः महिलांमध्ये आढळणारे आजार हिमोग्लोबीन ची कमतरता, हाडांमधील ठिसूळपणा, शारीरिक अशक्तपणा, मासिक पाळीतील तक्रारी, गर्भपिशवी तपासणी, पीसीओएस निदान इत्यादी प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या.
या शिबिरात स्री रोग व प्रस्तुती तज्ञ डॉ. नुपूर विवेक कदम यांनी सर्व महिला व मुलींची व्यक्तिशः तपासणी केली. डॉ. कदम गुरुकुल च्या सर्वेसर्वा डॉ. सविता लहू कदम यावेळी बोलताना म्हणाल्या की डॉ. कदम महिला व बाल हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध असून सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर, आंतर रुग्ण विभाग, बाह्य रुग्ण विभाग,प्रसुती केंद्र, लसीकरण केंद्र, एक्स-रे विभाग, मेडिकल क्लेम सुविधा, व्यंधत्व निवारण केंद्र, सोनोग्राफी इत्यादी प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी अनिता पराडकर, नंदकुमार यादव, सुप्रभा चंदनशिवे यांनी खूप कष्ट घेतले.
यावेळी पडस्थळ गावच्या उपसरपंच सपना बोंगाणे, ग्रामपंचायत सदस्या रेश्माताई रेडके, प्रियांका गव्हाणे, विद्या बोंगाणे, साने गुरुजी सोसायटीचे चेअरमन भारत बोंगाणे, पोलीस पाटील गणेश राऊत, सोसायटीचे संचालक आजिनाथ कदम, आनंता राऊत, रामेश्वर पवार, महेंद्र रेडके, राजेंद्र बोंगाणे,गणेश गव्हाणे इत्यादी उपस्थित होते. शिबिरामध्ये एकूण 55 महिला व मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली.