shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थिनींना निर्भया पथक द्वारे स्व:रक्षणासाठी मार्गदर्शन*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थिनींना निर्भया पथक द्वारे स्व:रक्षणासाठी मार्गदर्शन*
इंदापूर प्रतिनिधि: विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी या प्रशालेमधील किशोरवयीन मुलींना निर्भया पथकाच्या समुपदेशन विभागाच्या प्रमुख अमृता भोईटे मॅडम यांनी समाजामधील मुलींवर वाढते अत्याचार व मुलींना कठीण प्रसंगावेळी कोणते पाऊल उचलावे, दैनंदिन समाजामध्ये वावरत असताना मुलींना असुरक्षिततेची जाणीव होऊ लागल्यास, लैगिंक अत्याचाराविषयी माहिती , चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याचे उदाहरणाद्वारे मुलींना समजावून सांगितले व तसेच आपल्या जन्मदात्या आईवडीलपासून कोणतीही गोष्ट न लपवता त्यांना सगळ्या गोष्टी सांगाव्या. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो .मुलीने कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता न लाजता प्रत्येक गोष्ट आईवडिलांना व शाळेतील शिक्षिकांना सांगाव्या;  व तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर करावा व मुलींनी निर्जन स्थळी कठीण प्रसंगाची जाणीव होऊ लागल्यास हेल्प लाईन नं 112 हा नंबर डायल करावा लगेच तुम्हाला निर्भया पथकाची मदत मिळेल व तसेच दाखल पात्र गुन्ह्याची माहिती देण्यात आली. किशोरावस्थेमध्ये शरीरामध्ये होणारे बदल ,कुमारावस्थेमध्ये मुलामुलींना असणारे आकर्षनातून अघटित घटना घडून  अनेक मुलींचे आयुष्य बरबाद झाले आहे.   स्वतःच्या जीवनाकडे लक्ष देऊन न भरकटता शिक्षणा कडे लक्ष द्यावे.    निर्भयापथक समुपदेशन विभागाच्या प्रमुख  अमृता भोईटे मॅडमने सांगितले व मार्गदर्शन करण्यात आले. यावर प्रशालेतील विद्यार्थिनींनी मनात येणाऱ्या प्रश्नांचे शंका निरसन केले व दिलेली माहिती आम्हास कशा प्रकारे उपयुक्त पडेल हे आपल्या मनोगतनातून  सांगितले.
 यावेळी    जय भवानीगड विकास प्रतिष्ठान ,लाखेवाडी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सदस्य जि.प.पुणे श्रीमंत ढोले सर,संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले मॅडम,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पवार सर,संस्थेचे मुख्याध्यापक राजेंद्र सरगर सर,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य . डॉ.सम्राट खेडकर सर ,सर्व विभागाचे महिला  सुपरवायझर ,शिक्षिका व विद्यार्थीनी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिका कदम व अनुराधा शेंडे  कार्यक्रमाचे आभार रेशमा अनपट यांनी केले.
close