shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार सुप्रिया सुळे आश्रमशाळांच्या रखडलेल्या अनुदानासाठी मंत्रालयावर विद्यार्थ्यांसह मोर्चा काढणार.*

*खासदार सुप्रिया सुळे आश्रमशाळांच्या रखडलेल्या अनुदानासाठी मंत्रालयावर विद्यार्थ्यांसह मोर्चा काढणार.*
*इंदापूर प्रतिनिधी (दि.८) :- महाराष्ट्रातील इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांचे कोरोना काळापासून आजतागायत रखडलेले अनुदान शासनाने त्वरित न दिल्यास आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसह मंत्रालयावर थेट मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला शनिवारी (दि.७) भिमाई आश्रमशाळेत आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंनी दिला.
 संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरेंनी आपल्या प्रास्ताविकात कोरोना काळापासून आजतागायत शासनाकडून परीपोषण आहाराचे अनुदान आमच्या संस्थेसह महाराष्ट्रातील अनेक अनुदानीत आश्रमशाळांना पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने संस्थाचालकांना आर्थिक समस्यांना तोंड देताना येणाऱ्या अडचणी  संदर्भात खा. सुळें पुढे आपली कैफियत मांडली. यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारला वरील निर्वाणीचा इशारा दिला आहे.
ॲड.राहुल मखरे म्हणाले की,देशाचे नेते शरद पवार साहेबांनी अडचणीच्या काळात संस्थेला केलेली भरीव व मोलाची मदत आजही आमच्या स्मरणात आहे असे यावेळी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान इतर मागास बहुजन कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री श्री.  अतुल सावे यांच्याशी VJNT च्या आश्रमशाळांच्या रखडलेल्या अनुदानासंदर्भात भ्रमणध्वनीवरून खासदार सुळेंनी संपर्क साधला असता मंत्री महोदयांनी रखडलेले अनुदानाचा प्रश्न तात्काळ सोडवू असे आश्वासन खासदार सुळेंना दिले.
यावेळी खा.सुप्रिया सुळेंनी तथागत गौतम बुद्ध मूर्तीस व दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी खा.सुप्रिया सुळेंचा सत्कार इंदापूरच्या माजी नगरसेविका व संस्थेचे अध्यक्ष शकुंतला मखरेंच्या हस्ते करण्यात आला.
खा. सुळेंनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न जाणून घेतले. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आलात ? सध्या सुरु असलेल्या अभ्यास क्रमातील तुम्हाला कोणते विषय आवडतात ? तुम्ही बातम्या ऐकतात का? कोणते पदार्थ तुम्हाला आवडतात? आदी प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले.
विद्यार्थ्यांनीही खा. सुळेंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बिनधास्त दिली.
यावेळी खा. सुळेंना विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रश्न विचारले त्यात अगदी महिला आरक्षण, संसदेतील कामकाज, त्यांच्या आवडी निवडी, कौटुंबिक प्रश्न, तुम्हाला खासदारचं का व्हावसं वाटलं. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? आदी प्रश्न विचारले.खा सुळेंनी मोककळे पणाने दिलखुलासपणे समर्पक उत्तरे दिली.
थेट संवादास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांनीही खा. सुळेंच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी कार्यक्रमास प्रवीण माने,सागर मिसाळ, महारुद्र पाटील, अशोक घोगरे,किसन जावळे, कालिदास देवकर, बाबजी भोंग, माऊली नाचण, दत्तात्रय तोरसकर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ,सचिव ॲड.समीर मखरे,संचालक गोरख तिकोटे, संजय कांबळे, अस्मिता मखरे , विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आदी कार्यक्रमास बहु संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
तर कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांनी केले.
close