shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त महाभोंडल्याचे आयोजन


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन  )
धार्मिक बातमी

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले. 
वि.प्र.सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रशालेमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे  कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सकाळ-सत्रामध्ये तर हायस्कूल विभागाच्या विद्यार्थिनींसाठी भोंडला दुपार विभागामध्ये आयोजित करण्यात आला.


     श्री.महेश चोणगे,श्री.चंद्रकांत जोशी,श्री विक्रम शिंदे आणि श्री.योगेश कोठावदे  चित्रकला शिक्षकांनी काढलेल्या हत्तीच्या प्रतीकात्मक चित्राचे पूजन प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती सुनिता ढिले, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, श्री.हरिभाऊ कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल खामकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती सुरेखा परदेशी, यांच्या हस्ते करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
      श्रीमती सुनिता ढिले, श्रीमती क्षमा देशपांडे, श्रीमती सुरेखा परदेशी, श्रीमती संजीवनी आंबेकर आणि श्रीमती वैशाली तारू यांनी भोंडल्याची जुनी गाणी सुमधुर आवाजात गाऊन जुन्या गाण्यांना उजाळा दिला. गायलेल्या गाण्यावर विद्यार्थिनींबरोबर शिक्षिकांनी फेर धरून भोंडल्याचा आनंद घेतला. श्री.शिवकुमार दहिफळे यांनी दांडियाच्या लावलेल्या निवडक गाण्यावर विद्यार्थिनींनी मनमुराद आनंद लुटला.
     महाभोंडल्याच्या कार्यक्रमाचे स्वरूप आणि नियोजन पाहून नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. श्रीमती मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.श्री. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती सदस्य ॲड. श्री.संदीप आगरवाल, श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
     कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान मोलाचे ठरले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
close