शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
मंगळवार दिनांक २४ ऑक्टोंबर २०२३
📌दरोडेखोरांकडून गावठी कट्ट्यातून गोळीबार..? की, फटाके? यामुळें नागरिकांमध्ये घबराट..!!
📌सीसी टीव्ही फुटेज व मोबाईल सिडीआर तपासून गुन्हेगारांवर कारवाई करा -
आप्पासाहेब ढूस यांची जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार.
देवळाली प्रवरा : महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रिय खेळाडू.. तथा, प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमूख आप्पासाहेब ढूस यांच्या देवळाली प्रवरा येथील ढूस वस्तीवर असलेल्या घरावर मध्यरात्री दरोड्याच्या तयारीत आलेल्या गुन्हेगारांचा आप्पासाहेब ढूस हे त्यांच्या परवाना प्राप्त बंदुकिसह घराबाहेर आल्याने डाव फसला. व ढूस यांना पाहून या गुन्हेगारांनी आलेल्या चार चाकी वाहनातून पळ काढला. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तात्काळ या घटनेची गांभीर्याने चौकशी करावी व ढूस यांचे घराचे सिसी टिव्ही फुटेज मध्ये कैद झालेल्या गुन्हेगारांवर आणि त्यांच्या सूत्रधारांवर चौकशी अंती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आप्पासाहेब ढूस यांनी केली आहे.
या घटनेबद्दल प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात अप्पासाहेब ढूस यांनी म्हंटले आहे की, दि.२२/१०/२०२३ रोजी पहाटे ०१:४२ वा. देवळाली प्रवरा येथील ढूस वस्तीवर असलेल्या राहत्या घरी चार चाकी वाहनातून दरोड्याच्या तयारीत आलेल्या तीन चार दरोडेखोरांनी वस्तीच्या आवारात मुख्य प्रवेशद्वारातून वस्तीवर प्रवेश करनेचा प्रयत्न केला. मात्र आमच्या पाळीव कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाजाने मला जाग आली व मी दरवाजा उघडून माझेकडे स्वसंरक्षणार्थ असलेल्या परवाना प्राप्त रिव्हॉल्व्हर सह घराबाहेर आलो. मला पाहून या दरोडेखोरांनी चार पावले मागे जावून मला भिती दाखविणे साठी अग्निशस्राचे आवाज काढले. हे आवाज नेमके फटाके आहेत की, गावठी कट्ट्याचे असा संभ्रम निर्माण झाल्याने मी पुढे जाणे टाळले. मात्र मला पुढील काही निर्णय घेईपर्यंत त्या दरोडेखोरांनी आलेल्या चार चाकी वाहनातून गावाच्या दिशेने पळ काढला.
या घटनेमुळे संपूर्ण ढूस वस्तीवर दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी माझे घरासमोर असलेल्या सीसीटीव्हीत आलेल्या संशयित व्यक्तींची त्याचबरोबर इतर आवश्यक त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व संशयितांचे मोबाईल सिडीआर तपासून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी व देवळाली प्रवरा गावाचा बिहार होण्यापासून देवळालीला वाचवावे अशी विनंती आप्पासाहेब ढूस यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांचेकडे केली आहे.
या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय साहसी क्रीडा प्रकारात ज्या व्यक्तीचे नऊ राष्ट्रीय विक्रम आहेत, त्या व्यक्तीला अशी पोकळ भीती घालवण्याचे कुणी प्रयत्न कुणी करू नये. त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. उलट अशी घटना म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्य योग्य दिशेने सुरू असल्याची एकप्रकारे पोहच पावतीच असल्याचे ढूस यांनी सांगितले. व सुरू असलेले आमचे समाज कार्य यापुढेही असेच अविरत सुरूच राहील असे ढूस यांनी शेवटी सांगीतले.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

