लासुर्णे येथे बलिकापंचायत गटाने सादर केला
"बालविवाह " या सामाजिक विषयावर एक पथनाट्य.
इंदापूर प्रतिनिधि: सोमवार दिनांक २३ ऑक्टोंबर २०२३ रोजी निर्माण संस्थेच्या वतीने लासुर्णे गावातील राजे उमाजी नाईक कॉलनी येथे निळकंठेश्वर प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने " सावित्रीची शाळा " राजीव गांधीनगर मधील बलिकापंचायत गटाने "बालविवाह " या सामाजिक विषयावर एक पथनाट्य सादर केले. या पथनाट्य च्या माध्यमातून लहान वयात होणारी मुलांची विशेष करून मुलींची बालविवाह थांबण्याचे अव्हान केले. तसेच मुलींना उच्च शिक्षण, जीवन कौशल्य देऊन मुलींना सक्षम करण्याकडे भर द्यावा असे आव्हान व जनजागृती करण्यात आले. यावेळी निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, पुणे कडून रवी पवार, संकेश तोरणे, सावित्रीची शाळा शिक्षिका प्रियांका परधे व दिपाली कांबळे उपस्थित होत्या. सहभागी विद्यार्थी गणेश अडागळे, मेघराज पारधे,संभव खोमणे,मेघना पारधे,माया खोमणे,प्रणाली कोळेकर,पौर्णिमा कोळेकर,अमृता कोळेकर इत्यादी उपस्थित होते.

