shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा*

*भिमाई आश्रमशाळेत  धम्मचक्र प्रवर्तन दिन  साजरा* 

*बौद्ध धम्मच तुमच्या जीवनात क्रांती घडवून आणू शकतो....  नानासाहेब चव्हाण यांचे  प्रतिपादन*

इंदापूर प्रतिनिधी (24 ऑक्टोंबर): मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आणि मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात  धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
      संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे व  नानासाहेब चव्हाण यांच्या  हस्ते  तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे तात्यांच्या प्रतिमेस व समाधीस्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली.

यावेळी श्री. नानासाहेब चव्हाण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अशोक विजयादशमी दिवशी तथा दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौध्द धम्माचे चक्र डॉ.आंबेडकरांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले,तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र अनुवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.असे यावेळी  नमूद केले. तसेच त्यांनी आपल्या मार्गदर्शनात त्रिशरण,पंचशील यांचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगितला.यावेळी विद्यार्थ्यांनीही त्यांना काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांचे त्यांनी निरसनही केले.
यावेळी सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मनीषा जगताप(मखरे) मॅडम यांनी केले  यावेळी त्यांनी सम्राट अशोक यांनी केलेले  कार्य  याविषयी माहिती सांगितली.
यावेळी कार्यक्रमास संस्थेच्या  अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे (माजी नगरसेविका इंदापूर नगरपरिषद इंदापूर),संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, प्राचार्या अनिता साळवे मॅडम , मुख्याध्यापक साहेबराव पवार सर, तसेच सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
close