मंगळवार दिनांक २४ ऑक्टोंबर २०२२
देवळाली प्रवरा नगरपरिषदेत प्रशासकांची खुर्ची, दालन व सभागृह कोणत्याही राजकीय व्यक्तींनी वापरनेस प्रतिबंध करावा..!!
आणि..,
📌 कर्तव्यात कसूर करून खोटी माहिती दिल्याने नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केले म्हणून मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आठ दिवसात अहवाल सादर करा..!!
📌 आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे विभागीय आयुक्तांना पत्र..!!
राहुरी : देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर प्रशासक असे पर्यन्त त्यांची खुर्ची, दालन व कार्यालयातील सभागृह कोणत्याही राजकीय व्यक्तींनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापरनेस प्रतिबंध करावा. आणि, कर्तव्यात कसूर करून खोटी माहिती दिल्याने नगरपरिषदेचे नुकसान झाले म्हणून मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व आठ दिवसात कारवाईचा अहवाल सादर करावा असे लेखी पत्र प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्त, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, आणि श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यांना पाठविले आहे.
राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांचे मसीहा व अन्यायाच्या विरोधात विधान सभेत अत्यंत परखड भूमिका बजावणारे आमदार म्हणून राज्याला सुपरिचित असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस आणि जिल्हा प्रमुख अभिजीत दादा पोटे यांचे विनंतीवरून लक्ष घातले असून देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या प्रश्नांबाबत नाशिकच्या विभागीय आयुक्त यांना पत्र देवुन आठ दिवसात कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगीतले आहे.
सदर पत्राच्या प्रती अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यांना पाठविल्या आहेत.
आठ दिवसात.. नाशिक चे विभागीय आयुक्त यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेमध्ये जोपर्यंत शासन नियुक्त प्रशासक आहे तोपर्यंत प्रशासकांची खुर्ची कार्यालय व सभागृह स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी वापरण्यास प्रतिबंध केला नाही तर.. आणि, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी मुदतीत देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुख्य पाईप लाईन वर असलेल्या एअर व्हॉल्व च्या खाली असलेले अनधिकृत नळ जोड बंद केले नाही म्हणून नगरपरिषदेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर करून नगरपरिषदेचे नुकसान केल्याने व आंदोलकांना खोटी माहिती दिलेने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली नाही तर.., हा प्रश्न विधानसभेच्या पुढील अधिवेशनामध्ये उपस्थित करून त्यावर आवाज उठविण्याची मागणी आम्ही आमदार बच्चुभाऊ कडू यांच्याकडे करणार असल्याचे प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

