वडापुरी ओड्याच्या कडेचे गटर लाईनचे काम सुरू करा म्हणुन आज पासून ग्रामपंचायत सदस्य अंबिका बागल यांचे बेमुदत उपोषण आंदोलन झाले सुरू.
इंदापूर प्रतिनिधि : वडापुरी मधील ओड्याच्या कडेचे गटर लाईनचे काम सुरू करा अन्यथा ग्रामपंचायत सदस्य उपोषण आंदोलन करणार असल्याचे निवेदन ग्रामसेवक, सरपंच ग्रामपंचायत वडापुरी यांच्या नावाने दि.१०ऑक्टोंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत सदस्य अंबिका शत्रुघन बागल यांच्या सहीचे निवेदन पत्र देण्यात आले असून सदर निवेदन पत्र ग्रामपंचायत वडापुरी, पंचायत समिती इंदापूर, तहसील कार्यालय इंदापूर, इंदापूर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मेल द्वारे निवेदन पत्र देण्यात आले.
सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, वॉटर सप्लायच्या विहिरीच्या बाजूला शौचालयाचे व सांडपाणी साचत असून या पाण्यापासून माणसाच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हे काम बऱ्याच वर्षापासून पेंडीग असुन हे काम येत्या आठ दिवसात काम त्वरीत सुरू करावे. तसेच ग्रामसभेत ग्रामस्थांनी सुचवलेली विकास कामाचा आराखड्यात समावेश करण्यात यावा. मासिक मीटिंग मध्ये सदस्यांनी सुचवलेले विकास कामांचा आराखड्यात समावेश करण्यात यावा. ओढ्याच्या कडेच्या रस्त्याचा आराखड्यात समावेश करण्यात यावा. ग्रामसभेच्या आणि मासिक सभेच्या परस्पर आराखडा तयार करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला (दि.२५) रोजी सकाळ पासून सुरवात करण्यात आले आहे. सदर मागण्यावरती संध्याकाळ पर्यंत अद्याप तोडगा निघाला नाही.

