shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धुळे जिल्हा प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत अनुदानित आश्रमशाळा सामोडे चे घवघवीत यश..


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन  )
धार्मिक बातमी 

नुकत्याच शासकीय आश्रमशाळा रोहोड येथे झालेल्या प्रकल्प स्तरीय क्रीडा मध्ये अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून विभागीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.

       सामोडे येथील अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा १९ वर्षीय गटात खो खो स्पर्धेत विजयी झाला आहे तर उंच उडी,लांब उडी,शंभर मिटर धावणे या तिन्ही स्पर्धेत १९ वर्ष वयोगटात इसाब सोमनाथ कुवर तर आकेश दिनेश पावरा उंच उडी द्वितीय,१९ वर्ष वयोगटात कबड्डी संघ उपविजेता ठरला आहे,१००×५ रिले द्वितीय विजेते झाले आहेत.


विद्यार्थ्याची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर विजेत्या स्पर्धकांना मुख्याध्यापक पी.व्ही.जगताप , प्राचार्य झेड.एम.गवळी.यांच्या मार्गदर्शनाखाली संघ व्यवस्थापक एम.डी.माळी,प्रा.भिकन पारधी,प्रा.गणेश भावसार, शिक्षक जी.बी.पवार,शरद मोहिते यांचे अनमोल प्रशिक्षण लाभले.सर्व खेळाडूं सह क्रीडा प्रशिक्षकांचे महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था पिंपळनेर संस्थेचे अध्यक्ष अॅड संभाजी पगारे ,सचिव पुष्पलता पगारे, संचालक व्हि.एन.जिरेपाटील, विजयराव सोनवणे, विठ्ठलराव पगारे, स्वप्निल पगारे, छायाताई पगारे, मिलिंद महाजन यांनी अभिनंदन केले.
close