shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त निमगाव केतकी ते इंदापूर अशी काढण्यात आली बाईक रॅली.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त 
निमगाव केतकी ते इंदापूर अशी  काढण्यात आली
बाईक रॅली.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी
इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर तालुका मुस्लीम चॅरीटेबल ट्रस्ट व युवक संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन माजी राष्ट्रपती,भारतरत्न डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम यांचा जयंतीदिन रविवारी (दि.१५) उत्साहात साजरा करण्यात आला.
    निमगाव केतकी येथील केतकेश्वर सांस्कृतिक भवन येथे डॉ.कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. निमगाव केतकी ग्रामपंचायतीस डॉ.कलाम यांची भव्य प्रतिमा भेट देण्यात आली. निमगाव केतकी ते इंदापूर अशी बाईक रॅली काढण्यात आली. डॉ.कलाम यांची सजवलेली प्रतिमा वाहनाच्या अग्रभागी ठेवून काढलेली राष्ट्रभक्तीपर गीतांच्या लयीत काढण्यात आलेली ही बाईक रॅली संपूर्ण इंदापूर शहरात फिरवण्यात आली.
    दरम्यान अकलूज नाक्यावरील मदिना मस्जिदच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ट्रस्ट व युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते डॉ.कलाम चौकामधील फलकाचे अनावरण करण्यात आले.
    ट्रस्टचे अध्यक्ष दादाभाई मुलाणी, सचिव मुख्तार मुलाणी, मुसा पठाण, समीर मुलाणी, बबलू पठाण, रहिमान शेख, अस्लम मुलाणी,सचिन मुलाणी,मोईन शेख,असिफ डांगे,आलम शेख,सलमान मुलाणी,अस्लम शेख,अरबाज शेख,शाहिद मुलाणी,बशीर शेख सय्यद पठाण, रसद मुलाणी, जाकीर मुलाणी,दादाभाई शेख, जाबीर काझी,अश्पाक इनामदार सद्दाम जमादार,ॲड.असिफ बागवान,गुलाममुस्तफा सय्यद या पदाधिका-यांसह युवावर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमा सहभागी झाला होता.



close