प्रतिनिधी : आसावरी वायकर
चिचोंडी पाटील : १ / सन २०१४ मध्ये मोठ्या फसव्या घोषणा देऊन केंद्रात अस्तित्वात आलेल्या भाजपा सरकारने जनतेची मोठी दिशाभूल केलेली आहे,या विरोधात जनतेमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने नगर तालुक्यामध्ये जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली " होऊ द्या चर्चा " या कार्यक्रमाद्वारे भाजपचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडण्यात येत आहे.
पंधरा दिवस हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगर तालुक्यामध्ये गावोगावी हा कार्यक्रम होत आहे. आज चिचोंडी पाटील येथे या कार्यक्रमास जोरदार प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपनेते साजन पाचपुते, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले,पंचायत समिती मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे,तालुका प्रमुख राजेंद्र भगत,युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोमनाथ कांडके, श्रीगोंदा तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, उपतालुका प्रमुख जिवाजी लगड,सरपंच शरद पवार,डॉ.ययाती फिसके, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे,डॉ.मारुती ससे आदींनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांनी केले व चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी चेअरमन महादेव खडके,व्हा.चेअरमन सुरेश ठोंबरे,मा.सरपंच पांडुरंग कोकाटे,राजूशेठ हजारे, मच्छिंद्र खडके,दत्तात्रय हजारे,दिलीप पवार, आप्पासाहेब पवार,उपसरपंच महादजी कोकाटे,अण्णासाहेब कोकाटे,अंबादास फिसके, पंडित कोकाटे,बबन कोकाटे, संदीप कोकाटे, ज्ञानेश्वर ठोंबरे,प्रशांत कांबळे,राघू कोकाटे,काशिनाथ बेल्हेकर, अर्जुन वाडेकर,बाबासाहेब परकाळे,भाऊसाहेब वाडेकर, महादेव खडके,महादेव कोकाटे,चंद्रकांत पवणे, शाखाप्रमुख दत्ता जाधव,संतोष वाडेकर,उद्योजक प्रल्हाद खांदवे,शहाजी गोरे,रमेश कुलथे,अमृत पवार,कैलास ठोंबरे,अशोक तनपुरे,भाऊ गायवळ,दिलीप मांढरे, गजानन कोकाटे,ज्येष्ठ नागरिक विचार मंचचे कल्याण जगताप पा.,मोहन तनपुरे,रघुनाथ दळवी,पवार सर,खंडेराव पवार,गंगाधर,राणू मुटकुळे, अशोकदादा कोकाटे,बन्सी भद्रे,रावसाहेब कोकाटे, जयसिंग दळवी,शेषराव ठोंबरे,नानासाहेब कोकाटे, अमोल काकडे आदींसह सदस्य,शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या खोटारडेपणाचा पर्दाफास केला.
शेतकरी,व्यापारी,तरुण वर्ग,महिला वर्ग यांची वेगवेगळ्या घोषणांमधून कशी फसवणूक केली व जातीय तेढ कसे वाढीस लावले याची मुद्देसूद आकडेवारी व माहिती प्रा.शशिकांत गाडे सर यांनी आपल्या भाषणांमधून मांडली.
अनेक नागरिकांनी यावेळी भाजप सरकारमुळे आपल्या देशाची कशी वाट लागली यावर अभ्यासपूर्ण चर्चा केली.आभार अण्णासाहेब कोकाटे यांनी मानले.