*आजपासून इंदापूर येथील सावतामाळीनगर येथे नवरात्री महोत्सव फेस्टिवल २०२३ ला सरुवात .*
*नगरसेवक पोपट शिंदे यांच्या नवरात्र फेस्टिवल २०२३ चे जंगी अयोजन.*
इंदापूर प्रतिनिधि: इंदापुरातील सावतामाळीनगर मंदिर परिसर प्रभाग क्र. ७ येथे इंदापूर मध्ये प्रथमच विरोधी पक्ष नेते नगरसेवक पोपट शिंदे यांच्या माध्यमातून दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ रोजी पासून नवरात्री महोत्सव फेस्टिवल २०२३ ला सायं ६ वाजता सुरुवात होणार असून बिग बॉस इव्हेंट मध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमासाठी आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, मार्केट कमिटीचे संचालक मधुकर भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, शहा चारिटेबल ट्रस्टचे भरतशेठ शहा, तहसीलदार श्रीकांत पाटील, मुख्याधिकारी रामराजे कापरे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.तसेच फाउंडर रायझिंग स्टार अकॅडमीचे अनिकेत गायकवाड, रोशनी काकडे, सफिक शेख, ऐश्वर्या मोरे हे असणार आहेत तसेच
दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं ७ वाजता माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे, भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या संचालिका सौ सारिका भरणे, इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सौ अंकिताताई शहा ,कोरेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच निर्मलाताई नवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच इतर विशेष उपस्थितीमध्ये दांडिया नाईट्स, गरबा नाईट्स रॅम्प शो शोचे आयोजन करण्यात आले आहे .
तसेच दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी सायं ७ वाजता नगरसेवक पोपट शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गाजलेला कार्यक्रम होम मिनिस्टर पर्व नवे प्रस्तुत करता आकाश फल्ले नाट्य अभिनेता तरुण तुर्क म्हातारी अर्क प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन सायं ७ वाजता टेंभुर्णी नाका सावतामाळीनगर मंदिर परिसर प्रभाग क्र. ७ येथे करण्यात आले असल्याची माहिती राहुल गुंडेकर यांनी दिली. तसेच सदर कार्यक्रमासाठी आमदार दत्तात्रय भरणे कोरेगावच्या सरपंच निर्मलाताई नवले काय भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या संचालिका सौ सारिका भरणे , इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सौ अंकिता ताई शहा लाखेवाडी गावच्या सरपंच सौ चित्रलेखा ढोले इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या फेस्टिवल मध्ये दांडिया स्पर्धा
दांडिया स्पर्धा बक्षिसे खालील प्रमाणे:
प्रथम पारितोषक बेस्ट परफॉर्मन्स सेरु रिसॉर्ट टूर पास सौजन्य डॉ. अनुजा जोशी, डॉ. सागर जोशी, द्वितीय पारितोषक बेस्ट एनर्जी एलईडी टीव्ही डॉ. प्रतिभा वनवे, डॉ. अतुल वनवे, तृतीय पारितोषक बेस्ट कॉस्ट्यूम होम थिएटर सौजन्य डॉ. भारती कुरुडकर, डॉ. उदय कुरुडकर,
*रॅम्प शो बक्षिसे* खालील प्रमाणे : प्रथम पारितोषक स्मार्टवॉच, द्वितीय एरर बर्ड्स, तृतीय ब्लूटूथ हेडफोन,
**होम मिनिस्टर चे बक्षिसे*: प्रथम पारितोषक पैठणी आणि सोन्याची नथ सौजन्य:डॉ. प्रियंका रासकर, डॉ. अमोल रासकर, द्वितीय पारितोषक गरम पाण्याचा
गिझर सौजन्य: डॉ. गीता मगर ,डॉ. समीर मगर ,तृतीय पारितोषक टेबल फॅन सौजन्य: डॉ. कल्पना खाडे, डॉ. मिलिंद खाडे.

