shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खेड तालुका "रयत क्रांती"शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी :सुभाषराव पवळे, तर कार्याध्यक्षपदी: विठ्ठलशेठ आरगडे यांची निवड..!

खेड;-"खेड तालुका "रयत क्रांती"शेतकरी संघटनेच्या *अध्यक्षपदी :सुभाषराव पवळे, तर *कार्याध्यक्षपदी: विठ्ठलशेठ  आरगडे यांची निवड-सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत नियुक्तीची पत्रे! देण्यात आले.
      राज्याचे माजी कृषी राज्य मंत्री आदरणीय श्री. सदाभाऊ खोत यांच्या शुभहस्ते पुणे येथे काळुस ता. खेड जि. पुणे येथील श्री. सुभाष साहेबराव पवळे यांना खेड तालुका "रयत क्रांती" संघटनेचे 'अध्यक्षपद' देऊन संघटनेचे अधिकृत पत्र देण्यात आले. तसेच जुनेजाणते प्रगतशील शेतकरी श्री. विठ्ठल शेठ विष्णू आरगडे यांना खेड तालुका रयत क्रांती संघटना 'कार्याध्यक्ष' पदी नियुक्त करण्यात आले.

सुभाषराव‌ पवळे


विठ्ठल शेठ आरगडे

      यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिपकभाऊ भोसले, जिल्हा प्रवक्ते.गजानजी गांडेकर,विश्वनाथ पोटवडे. बाळासाहेब खलाटे, भरतभाऊ आरगडे, रमेश साळुंके,प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते/ पदाधिकारी उपस्थित होते.


       खेड तालुका रयत क्रांती संघटनेचे 'अध्यक्षपदी' तरुण, तडफदार,युवा, सक्षम, नेतृत्व सुभाष पवळे यांची निवड झाल्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रदीर्घ प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. तसेच अनुभवी,जाणते, सक्षम नेतृत्व, विठ्ठलशेठ  आरगडे यांची 'कार्याध्यक्षपदी'पदी निवड झाल्याने तालुक्यामध्ये या दोन्ही मान्यवरांचे स्वागत होत आहे.
      निवडीनंतर प्रतिक्रिया देताना श्री. सुभाष पवळे म्हणाले तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रश्न मार्गी लावण्यासाठी "रयत क्रांती" संघटनेचे संस्थापक मा.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शना खाली खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात चळवळ उभी केली जाईल व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंदोलने व विविध मार्गांचा अवलंब करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल. खेड तालुक्यात गाव तेथे "रयत क्रांती" संघटना शाखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊन चळवळीतून सक्षम नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू! यापुढे तालुक्यातील विभाग निहाय पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका व संघर्ष यात्रा यांचे आयोजन करण्यात येईल.
      सुभाष पवळे यांनी खेड तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणूनही कार्य केले आहे. परंतु त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सदाभाऊ यांचे नेतृत्व मान्य करून "रयत क्रांती" संघटनेमध्ये कार्य करण्यास सुरुवात केली. नवनिर्वाचित अध्यक्ष :सुभाष पवळे व कार्याध्यक्ष: विठ्ठलशेठ  आरगडे यांच्या नेतृत्वाखाली  तालुक्यातील विजेचा प्रश्न, भामा आसखेड, चासकमान पुनर्वसन शिक्के काढण्याचा प्रश्न, रिलायन्स टॉवर लाईन शेतकऱ्यांवरील अन्याय, ऊस झोनबंदी प्रश्न, उसाच्या एफ.आर.पी.संदर्भातील प्रश्न, कांदा दर प्रश्न, दुधाच्या दर निश्चितीचा प्रश्न, आझाद मैदानावर सलग ३४ दिवस उपोषण, खेड सेझ प्रकल्प शेतकऱ्यांचे प्रश्न ,अशा अनेक प्रश्ना संदर्भात त्यांनी आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोघांचेही कार्य पाहून  त्यांची नियुक्ती सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे.
      खेड तालुक्यातील रयत क्रांती संघटनेच्या या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमुळे तालुक्यात "रयत क्रांती "संघटनेमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
close