shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलांनी निर्भिडपणे सर्व क्षेत्रात अग्रेसर राहून काम करावे - उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर.

महिलांनी निर्भिडपणे  सर्व क्षेत्रात अग्रेसर राहून काम करावे - उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर.

तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने इंदापुरात प्रथमच नवदुर्गांचा सन्मान सोहळा झाला संपन्न.
     
इंदापूर प्रतिनिधि:  (दि. १७ ऑक्टो) तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने वतीने नवदुर्गांचा सन्मान सोहळा कार्यक्रम इंदापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात अतिशय उत्साहात पार पडला. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक ,सहकार ,आरोग्य  अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान तेजपृथ्वी ग्रुप तर्फे करण्यात आला.
 याकार्यक्रमास प्रमुख पाहुणे  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, इंदापूरच्या नगराध्यक्ष अंकिता शहा,मार्केट कमिटीचे संचालक मधुकर भरणे, कुस्तीगीर संघाचे महेंद्र रेडके, तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिता खरात, सामजिक कार्यकर्ते धरमचंद लोढा,  कलाकार मिताली कोळी , अपेक्षा पांचाळ , घुंगरू पिक्चर निर्माता बाबा गायकवाड हे व इतर मान्यवर उपस्थित होते.
      यावेळी मनीषाताई मखरे, चित्रलेखा ढोले, अमृता भोईटे,इंदू घनवट ,अरुणाताई कवडे , मनिषा वचे, अंकिता शहा,खैरुणिसा शेख ,अनुष्काताई भरणे ,अश्विनीताई ठोंबरे,जयश्री गटकुळ, राजमाता ग्रुप इत्यादी नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना राजेंद्र केसकर म्हणाले की,  महिलांनी निर्भिडपणे  सर्व क्षेत्रात अग्रेसर राहून काम करण्याचे आव्हान केले,महिला शक्ती खूप काही करू शकते. सर्व क्षेत्रात महिला पुढे आहेत. तुम्ही महिला या समाजात सर्व जबाबदारी पार पाडत असता आणि तुमचा सन्मान होन  ही खूप मोठी कामगिरी तेजपृथ्वी ग्रूपच्या माध्यमातून आज होत आहे. 
या वेळी अनिता खरात,बाबा गायकवाड, अंकिता शहा ,मिताली कोळी, अपेक्सा पांचाळ यांनी ही महिलांना मार्गदर्शन केले, 
सन्मानाला उत्तर देताना चित्रलेखा ढोले, मनीषाताई मखरे, इंदु घनवट, गटकुळ मॅडम यांनी तेजपृथ्वी ग्रुप व अनिता खरात यांच्या माध्यमातुन नेहमीच महिलांसाठी युवकांसाठी वेगवेळे कार्यक्रम घेतले जातात आणि त्याचा नक्किच महिलांना फायदा होतो   अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब खरात यांनी केले, 
कार्यक्रमाला नितीन कदम, नाना नरुटे,वाशिम शेख, सूरज धाईंजे, विकास शिंदे, लक्ष्मण वाघमोडे, शुभम पवार, प्रशांत उंबरे, दत्ता पांढरे,संकेत वाघमोडे, सोनु सय्यद, विशाल म्हेत्रे प्रदिप पाटील हे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश शिंगाडे ,सद्दाम बागवान ,संदीप रेडके,आर जी साबळे, विजय पवार अमानत बागवान, यांनी प्रयत्न केले.   रेश्मा ताई रेडके यांनी आभार प्रदर्शन केले.
close