shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकरी बांधवांनी शेतीसोबत आता जोडधंदा करण्याची गरज...आमदार नमिता मुंदडा

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी*  :-                               प्रत्येक क्षेत्रात आता झपाट्याने बदल होत आहे यातून कृषी क्षेत्र देखील सुटलेले नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हे होणारे बदल  स्वीकारत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे तसेच शेतीपूरक जोडधंदा देखील निवडण्याची गरज असल्याचे मत आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्त केले.                           


 कृषी उत्पन्न बाजार समिती  व कृषी तंत्रज्ञानात्मक तंत्रज्ञान आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या.                           
 कार्यक्रमास  उद्घाटक म्हणून भाजप नेते रमेश आडसकर हे होते तर सभापती अंकुश इंगळे,उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर,नगराध्यक्षा सिताताई बनसोड, भगवान केदार, ऋषिकेश आडसकर, विष्णू घुले, हारुणभाई इनामदार, सुरेश पाटील, महादेव सुर्यवंशी, दिलीप भिसे, नेताजी शिंदे, सुनील आबा गलांडे, जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. व्ही. पी. सुर्यवंशी, डॉ. सी. डी. बटेवाड, एम बी वराट, सुर्यकांत वडखेलकर यांची उपस्थिती होती.  पुढे बोलताना आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या की पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे .अशा स्थितीत शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची गरज आहे. शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या अनेक लाभ कारी योजना आहेत याची माहिती शेतकरी बांधवांनी सातत्याने घेण्याची गरज आहे.  आपल्याकडे रेशीम उद्योग आता बारशे धरू लागला आहे.   
  


हा व्यवसाय  शेतीपूरक असून चांगला जोडधंदा म्हणून आपण त्याच्याकडे पाहणे गरजेचे आहे . यावेळी बोलताना भाजप नेते रमेश आडसकर म्हणाले की  बाजार समितीच्या माध्यमातून  शेतकरी व व्यापारी या दोघांच्याही हीताला प्राध्यान देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. तर बाजार समितीचे सभापती अंकुश इंगळे यांनी प्रगतशील शेतकऱ्यांना दरवर्षी कृषिरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक  तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांनी केले. तर सूत्रसंचालन तथा आभार उपसभापती डॉक्टर वासुदेव नेहरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजार समितीचे सचिव संतोष देशमुख व आत्माचे योगेश पाटील यांनी विषेश परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
close