shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घोषित केलेला निधी मंजूर केल्याबद्दल वडापुरीच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे सत्कार करून मानले आभार .

घोषित केलेला निधी मंजूर केल्याबद्दल वडापुरीच्या राष्ट्रवादी काँग्रेस  कार्यकर्त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे सत्कार करून मानले आभार .                              

फोटो ओळ: आ. दत्तात्रय भरणे यांचा वडापुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी हार घालून सत्कार करून आभार मानण्यात आले
इंदापूर प्रतिनिधि:(दि. १४ ऑक्टो) रोजी माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा वडापुरी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भरणेवाडी येथील भरणे यांच्या निवासस्थानी भव्य असा सत्कार करून आभार मानण्यात आले.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी वडापुरी गावातील विविध विकास कामासाठी कोट्यावधी रुपये मंजूर करून गावाच्या विकासात भर पाडण्याचे काम केले असून त्यांनी मागील काही दिवसापूर्वी वडापुरी येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ प्रसंगी काटकरवस्तीच्या रस्त्यासाठी निधी मंजूर करू असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी २५/१५ मधून दहा लाख रुपये मंजूर केले. त्यामुळे वडापुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी हार घालून सत्कार करून आभार मानण्यात आले असे माजी उपसरपंच भागवत काटकर यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हनुमंत जगताप, कार्याध्यक्ष अतुल झगडे, तय्यब शेख, दयानंद चंदनशिवे,दादासाहेब जगताप,दादा बागल ,आनंद चंदनशिवे, सुरेश चंदनशिवे, सोमनाथ पवार,  महेंद्र काळे, भारत चंदनशिवे, महेंद्र काटकर, धीरज काटकर, प्रीतम रणसिंग, प्रमोद काटकर, सावता माळी, शिंदे इत्यादी उपस्थित होते.
--------------------------

close