shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मा. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविणे संदर्भात चर्चा करून व धोरण ठरवले!"

खेड;-
"खेड तालुका रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मा. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविणे संदर्भात चर्चा केली व धोरण ठरवले!" 

       शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२३रोजी पुणे येथेरयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक व राज्याचे मा. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन  खेड तालुक्यातील
 शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. सदाभाऊंनी तालुक्यातील प्रलंबित प्रश्न समजावून घेऊन त्यावर कशा पद्धतीने सोडवणूक करायची याबाबत नियोजन केले. आणि मार्गदर्शन केले. प्रश्न सोडवूनकी संदर्भात दिशाही ठरवली.
      तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांमध्ये भामा आसखेड, चासकमान प्रकल्पांतर्गत चाळीस(४०) वर्षांपूर्वी पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के काढून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे. चासकमान भामा आसखेड कालवे रद्द झाल्यामुळे चाकण, काळुस, मरकळ भागातील शेत जमिनीवर टाकलेले शिक्के लाभ क्षेत्रात येत नसल्यामुळे  काढून टाकावेत आणि शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करावा. कालवे रद्द झाले. तरी१८८५ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी राखून ठेवण्यात आली आहे. या पाठीमागे फार मोठा स्वार्थी राजकीय डावपेच असून भूमाफियां कडून या जमिनी अत्यल्प दरातहस्तगत करून प्लॉटिंग द्वारे मोठा लाभ मिळवण्याचे  षडयंत्र चालू आहे. त्यामुळे१८८५हेक्टर जमीन लाभ क्षेत्रात येत नसल्यामुळे त्यावरील पुनर्वसनासाठी राखीव शेरा काढून मूळ शेतकऱ्यांचा सातबारा त्वरित कोरा करावा अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे.
       काळुस गावासाठी चासकमान अंतर्गत कालव्याद्वारे शेतीसाठी येणारे पाणी  आले नाही. कालवा पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथील शेती क्षेत्र  लाभ क्षेत्रात येत नाही त्यामुळे "पाणी नाही तर जमीन नाही!" या भूमिकेतून काळूस मधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर ४० वर्षापासून टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के काढण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी. अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.
      खेड सेझ मधील शेतकऱ्याना १५% परतावा प्रश्नासंदर्भात शासनाकडून चांगला मोबदला लवकरात लवकर मिळवून देणे , तालुक्यातील रिंग रोड मध्ये संपादित जमीन मालकांना चांगला मोबदला मिळवून देणे त्यांचा विरोध लक्षात घेणे, कलमोडी धरणातील पाणी पूर्व भागासाठी दुष्काळग्रस्त भागांसाठी देण्याबाबत पाठपुरावा करणे, चाकण एम.आय.डी.सी. पाचवा टप्पा शेतजमीन संपादन संदर्भात विरोध करणाऱ्या शेतकऱ्याच्याभूमिकेबाबत धोरण ठरविणे,विजेच्या प्रश्ना संदर्भात शेतकऱ्यांवर होणारा अन्याय , आणि इतर प्रश्नांबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली.

      लवकरच खेड तालुक्यातील  प्रश्न संदर्भात शासकीय पातळीवर  बैठकीचे नियोजन केले जाईल व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पाठपुरावा करेल शासनाकडून वेळीच दखल घेतली नाही तर तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी भव्य रस्ता रोको, जन आक्रोश आंदोलन, उपोषण, या स्वरूपाची तीव्र  आंदोलनने करण्याचा निर्धार यावेळी सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही! असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.

        खेड तालुक्यातील रयत क्रांती संघटनेला सदाभाऊ खोत यांची चांगले बळ मिळत असून त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत आहे‌ याचे समाधान आहे. पुढील काळातही तालुक्यातीलशेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सदाभाऊ खोत यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल व प्रश्न मार्गी लावले जातील असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आशावाद व्यक्त केला आहे.

      सदाभाऊ खोत यांच्या भेटीसाठी खेड तालुका रयत क्रांती संघटनेचे गजानन गांडेकर, सुभाष पवळे,  विठ्ठल शेठ आरगडे, विश्वास पोटवडे, मिनीनाथ साळुंखे, भरतभाऊ आरगडे , बाळासाहेब खलाटे,प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे हे उपस्थित होते.
close