shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक तापमान वाढीचे बळी कोण?


       ग्लोबल वार्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ हा जागतिक प्रश्न एव्हाना अपना सर्वांना माहीत झाला आहे कार्बन  डाय-ऑक्साईड,कार्बन- मोनाक्साईड, मिथेन यासारख्या वायूचे प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. जगाच्या विविध ठिकाणाचे नॉर्मल तापमानाचा जर विचार केला तर सायबेरियाचे  2° से ( उणे 2 अंश सेल्सिअस) तपमान असते तर आपल्याकडे उन्हाळ्यात ते 32 ते 35 असते राजस्थान मध्ये हे तापमान 40° 42° 45°  से पर्यंत असते मात्र या वर्षाच्या जागतिक सरासरी तापमानाचा विचार केला तर ते 17° सेल्सिअस आहे आणि ही आकडेवारी तशी भयानक आहेत जी ठिकाणी  बर्फाच्छादित होती तिथे बर्फ वितळत आहे. पुढचे धोके गडद होत आहेत हीच परिस्थिती अशीच सुरू राहिली तर पुढील 25 वर्षात पृथ्वीचे सरासरी तापमान 50° से पर्यंत जाईल आणि पृथ्वीवरील संपूर्ण मानव जातीला अत्यंत भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल.

         हे तर झाल भविष्याच पण ही परिस्थिती आपल्या समोर निर्माण करणारे जागतिक पातळीवर प्रदूषण वाढवणारे कोण याचा विचार करणे महत्वाचे आहे आपण नेहमी म्हणतो मानव पण कोणता हे नेमकेपणाने जर शोधायचे असेल तर जगातील पेट्रो केमिकल कंपन्यां त्यांना  वित्तपुरवठा करणाऱ्या बँका आणि त्यातून नफा कमावणारे नफेखोर उदयोगपती हे लोक मोठ्या प्रमाणात या जागतिक वाढीला कारणीभूत आहे परंतु यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे त्याचा यामध्ये दोष काय आहे.अल्पभूधारक   जीरायतदार शेतकरी, शेतमजूर ऊसतोडणी मजूर व सर्वच कामगार त्यांच्या एकूण आयुष्यावर जीवनपद्धतीवर याचा दूरगामी दुष्टपरिणाम होत आहे याची जबाबदारी कोणाची? 
जागतिक तापमान वाढीमुळे ऋतुचक्र बदलले आहे सप्टेंबर मध्ये पावसाळा संपतो मात्र जागतिक तापमान वाढीमुळे पाऊस फेब्रुवारी पर्यंत पडताना मागील वर्षी दिसला अनेक ठिकाणी ढगफुटी झाली यामध्ये ज्या शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली त्यांच्यावरच्या कर्जाच्या डोंगराला शेतकऱ्यांच्या वैफल्यग्रसतेतून होणाऱ्या आत्महत्यांना जबाबदार कोण? ऊसतोडणी कामगार दसऱ्या नंतर आठ महिन्यासाठी उपजीविकेसाठी राज्यातील काही भागात व इतर राज्यात स्थलांतरीत होतो उसतोडणीसाठी जातानाच तो ऍडव्हान्स घेऊन जात असतो  ऊसतोडणी चालू असताना जर बेमोसम (अवकाळी) पाऊस झाला तर काम थांबते शेत 5/6 दिवस कधी कधी 10-10 दिवस सुकत नाही या काळात मुकादम त्याला पोसत नसतो त्याची जबाबदारी त्या काळात स्वताची असते असा एका सिझनमध्ये 5-6 वेळा अवकाळी पाऊस पडला तर पूर्ण सिझन मध्ये 50 दिवस त्याचा रोजगार बुडून त्या काळातला जादा खर्च ही स्वतावर पडतो आणि त्याने ऍडव्हान्स म्हणून घेतलेले कर्ज फिटत नाही पुढच्या सिझनला पण मागचे कर्ज शिल्लक राहून तो वेठबिगारीच्या व कर्जाच्या फेऱ्यात अडकडत जातो याला जबाबदार कोण?मागील काही वर्षात त्वचेची एलर्जी त्वचारोग,उष्मघात उघड्यावर उन्हात काम करण्याचा व्यक्तींना होणारे अंगदुखीचा त्रास शारीरिक पूर्वीपेक्षा वाढलेले असलेले पहायला मिळतात.
              या सर्वांना जबाबदार जागतिक तापमान वाढ त्यामुळे तापमानात झालेले बदल व त्यामुळे बाधित होणारे शेतकरी विविध क्षेत्रात काम करणारा कामगारवर्ग यांचे कोणते व किती प्रमाणात नुकसान होते होते याची आकडेवारी सरकारकडे आहे काय? असेल तर यास कारणीभूत असणाऱ्यांनी याची जबाबदारी घ्यावी व ज्यांची काही चूक नसताना ते विविध आजार व आर्थिक, सामाजिक गुलामगिरीच्या चक्रात फसत चालले आहेत त्यांना नुकसान भरपाईचा अधिकार आहे ते क्लायमेट जस्टिस  कॅम्पेन चालवण्याची आवश्यकता आहे.व मानव म्हणून जबाबदारीने जागतिक तापमानवाढ थांबवण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करण्याची आवश्यकता आहे. 

              श्री किरण ठाकरे सर
               सामाजिक कार्यकर्ते
close