shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आता खासदारांकडून निळवंडेसाठी निधी... जनता दरबारातून खा.लोखंडे बांधावर...केलवडचा निळवंडे पाणी प्रश्न मार्गी..!

आता खासदारांकडून निळवंडेसाठी निधी

जनता दरबारातून खा लोखंडे बांधावर

केलवडचा निळवंडे पाणी प्रश्न मार्गी

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )

        निळवंडे कालव्याची पहिली चाचणी झाली यावेळी केलवड ते दगड - पिंपरी गावातील कालव्याचे मोरीचे काम बाकी राहिल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही, त्यामुळे या कामासाठी खा सदाशिव लोखंडे यांनी आपल्या खा निधीतून पाच लाख देण्याची घोषणा केली आहे,  त्यामुळे तात्काळ हे काम सुरू होणार असून केलवडला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला . यावेळी अतिसंघर्ष केलवडचा प्रश्न मार्गी लागला आहेत . 

     राहाता तालुक्यातील केलवड गाव हे १८२ गावांपेक्षा अतिसंघर्ष करणारे गाव म्हणून ओळखले जाते परंतु याच गावात निळवंडे कालव्याचे पाणी आले नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते . यामुळे रविवारी खा लोखंडे यांच्या जनता दरबारात केलवड गावातील १० ते १५ शेतकरी गेले.यावेळी मी केलवड गावात येतो असे खा लोखंडे यांनी सांगितले व सोमवारी दोन वाजता खासदार गावात आले . व शेतकऱ्यांच्या बांधावर बैठक लावली यावेळी जलसंपदाचे अधिकारी देखील उपस्थित होते.यावेळी हा प्रश्न खा लोखंडे यांनी मार्गी लावला आहे.

      केलवड हा भाग कोपरगाव शाखेत येतो, यासाठी टेंडर काढले आहे, परंतु ठेकेदार निवडला नाही  त्यामुळे हे काम दिवसेंदिवस लेट होत असल्याने निळवंडे कालव्याच्या दुसऱ्या चाचणीत देखील केलवड गाव पाण्यापासून वंचित राहत होते त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. त्यामुळे निळवंडेचे जनक म्हणून ओळखले जाणारे खा सदाशिव लोखंडे यांनी तात्काळ ५ लाख देण्याचे सांगत जिल्हाधिकारी यांना फोन करून रक्कम वर्ग करण्याची सूचना दिली . त्यामुळे खा लोखंडे यांचे शेतकऱ्यांनी अभिनंदर केले . तसेच गावातील दोन तलाव देखील भरून काढण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

     यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, शाखा अभियंता विवेक लव्हाट, केलवड निळवंडे जनक गंगाधर गमे, सरपंच दीपक कांदळकर,  नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे यांच्यासह गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते .


  केलवड हे गाव निळवंडेच्या संघर्षामधील एक नंबरचे गाव आहे, त्यांनी खूप आंदोलने केले असून लाठ्या खाल्ल्या आहे . खासदार म्हणून या गावाच्या कामासाठी मी ५ लाख देत आहे . जनतेचा सेवक म्हणून मी हे काम पूर्ण करणार आहेत . 
-----सदाशिव लोखंडे, खासदार शिर्डी

केलवडला येणार लवकर पाणी...
     वारंवार प्रतिक्षा करणारे केलवड गाव आता निळवंडेच्या दुसऱ्या चाचणीत पाण्याचा उपभोग घेणार आहे, पाच लाखात दगड - पिंपरी येथील मोरीच्या कामासाठी मुरूम, माती व कागदाचा वापर करून पाणी गावात काढले जाणार आहेत . व गावातील काही तलाव देखील भरविले जाणार आहे 

   निळवंडेसाठी संघर्ष करण्याचा जन्म हा केलवड गावात झाला, आजपर्यंत अनेक नेते झाले परंतु खा सदाशिव लोखंडे हे आमच्या निळवंडे पाण्याचे जनक असून तेच ह्या गावाचा प्रश्न मार्गी लागणार आहे . त्यांनी दिलेल्या निधीतून हे काम झाल्यावर आपचे गाव मोठी मिरवणूक काढणार असून जल्लोष साजरा करणार आहेत . 
----गंगाधर गमे, निळवंडे जनक , केलवड , ता : राहाता
close