shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उप कार्यकारी अभियंतांना निवेदन...!

.               नगर तालुक्यातील घोसपुरी सह 15 गावांमध्ये 50 कोटी रुपये निधीचे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेले काम निकृष्ट दर्जाचे.        
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) अंतर्गत नगर तालुक्यातील, घोसपूरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे नव्याने काम सुरू आहे. सदर योजनेसाठी शासनाने तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या घोसपुरी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट गावासह इतर 15 गावांचा समावेश आहे. त्यामध्ये पाईपलाईनच्या कामासह 5 नवीन पाण्याच्या टाक्यांचे काम करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार योजनेतील मुख्य पाईपलाईन ही जमिनीच्या पृष्ठभागापासून (३.५ फुट) १.१४ मीटर इतकी खोलवर असावी. जेणेकरून पाईपलाईन ला कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता, ती दिर्ग काळ सुरक्षित राहील. परंतु अनेक ठिकाणी कंत्राटदार हे पैसे वाचवण्यासाठी पाईपलाईन केवळ एक ते दिड फूट एवढीच खोलवर घालतात.


अशाच प्रकारची तक्रार आम्हाला, या योजनेत समाविष्ट असणाऱ्या, बाबुर्डी घुमट या गावातील स्थानिक नागरिकांकडून कळाली. त्या ठिकाणी आम्ही गेलो असता, गावात जवळपास सर्वच ठिकाणी केवळ पाईप लाईन एक ते दीड फूट एवढीच जमिनीत पुरली असल्याचे निदर्शनास आले. वास्तविक पाहता जलजीवन मिशनच्या कामांमध्ये पाण्याच्या टाक्यांच्या बांधणीचे काम हे महत्त्वाचे आहे. परंतु ठेकेदार हे भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून केवळ वर- वर पाईपलाईन टाकून कमी वेळेत मोठ्याप्रमाणावर बिले काढून घेतात. योजना चालेल की नाही, पाईप लाईन व्यवस्थीत टिकेल की नाही, याचा कुठलाही विचार न करता, सामान्यांचा पैसा भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून लुटण्याच काम करतात आणि पर्यायाने अशा योजना पुढे बंद  पडण्याची भीती असते घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेतील बाबुर्डी घुमट गावासह इतरही 15 गावातील पाईपलाईनच्या कामाची आपण स्वतः पाहणी करून घावी .तसेच ज्या ज्या ठिकाणी, पाईपलाईन ही एक ते दीड फूट पुरलेली आहे ती ठेकेदारांकडून पुन्हा उकरून, त्या सर्व ठिकाणी एक मीटर पेक्षा जास्त पाईपलाईन खोलवर टाकून घ्यावी. तसेच यापुढे जोपर्यंत योजनेतील महत्त्वाच्या 5 पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्या विभागाने संबंधित बेजबाबदार ठेकेदारास पैसे अदा करू नये या मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या उपविभागीय अभियंता एस. रुमाले यांना निवेदन देण्यात आले यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शेखर पंचमुख, योगेश भालेराव, भीमा कराळे, निलेश सातपुते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.  अन्यथा संबंधित ठेकेदारास पैसे अदा केल्यास संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयास टाळे ठोकून आपल्याला जाहीर काळे फसविण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे...
close