shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राधिका माध्यमिक विद्यालयात संदीप पांढरे यांनी ३२ अनाथ विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे केले वाटप.

राधिका माध्यमिक विद्यालयात संदीप पांढरे  यांनी ३२ अनाथ विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे  केले वाटप.

शालेय दप्तर वाटप हा उपक्रम इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल - मुख्याध्यापक  दत्तात्रय दडस .
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर  येथील राधिका माध्यमिक विद्यालया मध्ये इंदापूर शहरामधिल प्रसिद्ध फार्मासिस्ट व पराग मेडिकलचे मालक  संदीप पांढरे सर यांनी ३२ अनाथ विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप केले.
 त्यावेळी त्यांच्याबरोबर इंदापूर शहरातील फार्मासिस्ट  सुहास पवार , जमीर शेख सर तसेच राजेंद्र राऊत हेही उपस्थित होते.
 त्यांचा हा उपक्रम इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशा शब्दात  विद्यालयाचे मुख्याध्यापक  दत्तात्रय दडस 
यांनी गौरव उद्गार  काढले. व त्यांचा सन्मान करण्यात आला.
 यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थिती होती.
 त्यांच्या या स्तुत्य कार्यक्रमाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले . 
close