प्रतिनिधी : जिवाजी लगड
पारगाव भातोडी : ९ / नगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव भातोडी येथे शनिवार दि . ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या चुरशीच्या निवड प्रक्रियेत डॉ. महेश शिंदे यांचे अध्यक्षपदी व श्री. प्रसाद पवार यांची उपाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली तसेच अश्विन बंडू जगताप, कविता महेश गुंड, प्रमिला ज्ञानेश्वर शिंदे,छाया गणेश उमाप,गणेश सूर्यभान शिंदे, मुक्ता महादेव शिंदे निलेश महादेव शिंदे, फरजाना आसिफ शेख, सविता सचिन शिंदे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी श्री. सोनार साहेब उदावंत सर, श्रीमती कुलकर्णी मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका शेजुळ मॅडम व सहशिक्षक श्री नाना गाढवे सर यांनी योग्य असे नियोजन केले.
निवडणूक निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांना माजी सरपंच शिवाजी दादा शिंदे,प्रदीप शिंदे, गोविंद गुंड, भाऊसाहेब शिंदे, राजू शिंदे, हमीद शेख, दादा मेजर, दत्तात्रय तनपुरे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी किरण शिंदे, महेश गुंड, ईश्वर शिंदे, कैलास शिंदे, शिवा शिंदे, अमृत शिंदे, आदिनाथ सांगळे, नामदेव शिंदे, बद्रीनाथ शिंदे, यश होनावळे,सचिन उमाप, विजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य गणेश गुंड, दादू जगताप, महादेव शिंदे, अभी शिंदे, सनी शिंदे, अशोक जगताप, आदित्य जगताप, सुरज शिंदे, शुभम गुंड ,खुशाल शिंदे, संदीप शिंदे, प्रताप शिंदे,लहानु उमाप, बबन उमाप आदी उपस्थित होते .