तालुक्याच्या आमदाराच्या हस्ते नातिचा आणि मुलीचा सन्मान एकाच व्यासपीठावर पाहून शंकर भोंग गेले भारावून.
शिक्षणानेच परिवारामध्ये संस्कार रुजवता येतात - शंकर भोंग.
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर तालुक्यातील गोतंडी येथील रहिवासी असणारे जुनी चौथी शिक्षण घेतलेले शंकर नामदेव भोंग यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या जीवनात स्वतःची मुले घडवण्यामध्ये केला. त्याचबरोबर त्यांनी तोच वारसा तेच संस्कार नातवंडावर करीत असल्याचे दिसून आले. दि.७ ऑक्टोबर २०२३ रोजी इंदापूर पंचायत समिती येथे शिक्षण विभागाच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये त्यांची नात काव्या वैभव भोंग या मुलीने इयत्ता चौथी मध्ये मंथन एन एस एस सी, बी डी एस, इंदापूर टॅलेंट सर्च, क्रिएटिव्ह अकॅडमी स्पर्धा, आला रे आला गणपती आला हे गीत युट्युब वर तिने गायले आहे अशा स्पर्धेमध्ये गुणवत्ता यादीत क्रमांक पटकावला तसेच त्यांची मुलगी सौ.वंदना नितीन बनसूडे ह्या एल.जी. बनसूडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या म्हणून काम पाहतात तेथे प्रज्ञाशोध परीक्षेसाठी परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिल्याबद्दल इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे ,गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षण अधिकारी खरात यांच्या हस्ते एकाच व्यासपीठावरती सत्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये शंकर भोंग यांनी उपस्थिती दर्शवून एकाच व्यासपीठावर आपल्या नातीचा व मुलीचा सन्मान सोहळा पाहून कौतुक केले . हे कौतुक या कार्यक्रमात कुतूहलाचा विषय ठरला. शिक्षणाशिवाय जीवनामध्ये प्रगती होऊ शकत नाही. तसेच शिक्षणानेच परिवारामध्ये संस्कार रुजवता येतात हे त्यांनी यावेळी सांगितले.
शंकर भोंग यांचा एक मुलगा शेती करतो तर एक शिक्षक आहे. त्यांची मुलगी ही पळसदेव येथील बनसुडे परिवारामध्ये दिली असून श्री हनुमंत (नाना) बनसुडे यांनी स्थापन केलेल्या एल.जी. बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसदेवच्या शिक्षण संस्थेत प्राचार्या म्हणून कार्यरत आहे.