शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
लायन्स क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल एज्युकेशनल प्रोजेक्ट आयोजित, पहिली ते चौथीच्या मुलांसाठी, मौखिक आरोग्यावर, दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी, रेजिना पॅसीज हायस्कूल भायखळा येथे वैयक्तिक आरोग्यपर कार्यक्रम आयोजित केला होता.
डॉ. कल्याणी सुनील तांबवेकर डेंटल सर्जन* यांनी जाणीव जागृतीपर व्याख्यानातून मुलांना, *मौखिक आरोग्य निरोगी कसे ठेवावे मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी मौखिक आरोग्य चांगले राखण्यासाठी काय करावे आणि काय करू नये* याविषयीचे मार्गदर्शन, सहज शैलीतील आपल्या व्याख्यानातून दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे *फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विराफ मिस्त्री* यांनी विद्यार्थ्यांना, *सुंदर चेहरा म्हणजे चेहऱ्यावरील सुंदर हास्य* याविषयी आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले.
रेजिना पासिस कानव्हेंट शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जुनेजा व त्यांचे सहकारी यांनी उत्तम सहकार्य केले.
व या शैक्षणिक व आरोग्यवर्धक उपक्रमाचे स्वागत व कौतुक करत आभारही व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे निवेदन क्लबच्या सेक्रेटरी लायन एम जे एफ माननीय फरीदा कॉन्ट्रॅक्टर यांनी केले.
* मुंबई जिल्हा अध्यक्ष लायन एकनाथ तांबवेकर यांचे * या शिक्षणावर आधारित कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्य योगदान होते .
याप्रसंगी लायन्स क्लबच्या प्रेसिडेन्ट फरीदा फरहान रंगवाला, फर्स्ट व्हाईस प्रेसिडेन्ट फरीदा युसुफ नेतरवाला, ट्रेझरर रादिया जुझर रंगवाला, डायरेक्टर मुनिरा फक्रुद्दीन पुनावाला , विविध पदाधिकारी व कोकण मराठी साहित्य परिषद देवनार शाखाध्यक्षा श्रीमती पुष्पा कोल्हे यांची विशेष उपस्थिती होती.