shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई प्रसाद बुंदी पाकिटावर उत्पादन तारीख स्टॅम्पची विनंती त्वरित मान्य


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी 

शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात समाधीचे  दर्शन झाल्यावर संस्थान तर्फे मोफत बुंदीची पाकिटे यांचे वाटप करण्यात येते, पाकिटावर बुंदीचे सेवन ४८ तासांच्या आत करावे अशी सूचना देण्यात आली आहे, परंतु मोफत बुंदी पॅकेट बनवताना त्यावर बुंदी पाकीट कधी बनविले त्याच्या उत्पादन तारखेचा उल्लेख नव्हता,   
सदरची चूक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी श्री शिवशंकर यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिली व सदर प्रकाराबाबत तोंडी सूचना केल्या की, अनेक लहान मुलांनी, वृद्ध व्यक्तींनी मोठ्यांनी बुंदी प्रसादाचा लाभ घेतला पण बुंदी बनवण्याची तारीख नसल्यामुळे आणि बुंदी हा नाशवंत खाद्यपदार्थ असल्याने, बुंदी पाकिटाचे कधी पॅकिंग केले व पॅकिंग बुंदी ही ताजी की शिळी ती बंद पाकिटात वाटली जात असल्यामुळे लक्ष्यात येत नव्हते,  गर्दी नसतांना बनविलेली बुंदी अनेक दिवस पडून राहिल्याने शिळी होत असे परिणामी साई भक्त आणि लहान मुलांसाठी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच प्रकारे श्री साईबाबांच्या प्रसादाच्या रूपात बुंदीतुन विषबाधा , गॅस्ट्रो सारखे आजार होण्याची भीती संभवता निर्माण झाली होती व त्यामुळे अनेक साईभक्त आजारी  पडले असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सदर बाब लक्षात येताच साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी शिवशंकर यांनी त्वरित बुंदी पाकिटावर उत्पादन तारखेचा स्टॅम्प लावण्याची तोंडी मागणी मान्य केली व तशी सूचना संबंधित कार्यालयास दिली
 एक योग्य मागणी पूर्ण होते आणि कर्तव्यदक्ष अधिकारी तोंडी सूचना स्वीकारून त्याची अंमलबजावणी करतात, याचे जिवंत उदाहरण कार्यकारी अधिकारी श्री शिवशंकर साहेब यांनी दिले.

यावेळी अॅड.विक्रांत वाघचौरे यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा शिर्डी, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आभार पत्र पाठवून कार्यकारी अधिकारी शिवशंकर यांचे आभार मानले.
close