शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
धार्मिक बातमी
जुन्नर सावरगाव येथील संत आप्पासाहेब महाराजांची ३४३वी पुण्यतिथी सोहळा दि ४ ते ६ सप्टेंबर रोजी सालाबादप्रमाणे याही वर्षी सावरगाव येथे संगमनेरकर परिवारातर्फे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सांगता हरिभक्त परायणश श्री दत्तात्रय रुकारी महाराज यांचे कीर्तनाने झाली याप्रसंगी श्री राम भजनी मंडळ सावरगाव, श्री राम संगीत भजनी मंडळ पारुंडा, गवळीबाबा भजनी मंडळ खानापूर, या भजनी मंडळ सलग तीनही दिवस सेवादिली हरिपाठ, अखंड हरिनाम व वीणावादनाचे काम गावकऱ्यांच्या सेवेने झाली, शिर्डी येथील श्री.अक्षयजी महाजन, सौ.दिपाली महाजन, अभिजित व सौ.सोनल महाजन मंचर, योगेश व सौ. ज्योती विचुरकर पुणे यांचे हस्ते महाआरती करण्यात आली.
आमटी, भाकरी, सोनपापडी च्या भोजन महाप्रसादाचे याप्रसंगी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आवर्जून प्रेरणा प्रदीप वैद्य शिर्डी, आशाताई लंबे मुंबई, दर्शन केळकर नाशिक, यांचेसह असंख्य भाविक उपस्थित होते, सप्ताह यशस्वी होण्यासाठी प्रसाद संगमनेरकर, अभिजित संगमनेरकर, संतोष संगमनेरकर, सागर व प्रवीण संगमनेरकर यांनी परिश्रम घेतले. संगमनेरकर परिवारातर्फे भरत संगमनेरकर यांनी आभार मानले.