shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कान्हुर पठार उपसा सिंचन योजनेबाबत प्रशासन सकारात्मत - रघुनाथ आंबेडकर


अहमदनगर प्रतिनिधी:
जिल्ह्यातील पारनेर  निमा पारनेर तालुका आजही दुष्काळी जिवन जगत आहे म्हणुन " कान्हुर पठार उपसा सिंचन योजना " मंजुर व्हावी या करीता राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभाग - पुणे कार्यालयास दी .२१ / ५ /२०२३ रोजी सदर योजना व्हावी म्हणुन लेखी पत्र दिले होते.

परंतु प्रशासनाने त्या विषयाची गांभिर्याने दखल न घेतल्याने भाजपा कामगार मोर्चा , पारनेर तालुकाध्यक्ष  रघुनाथ आंबेडकर यांनी जलसंपदा विभाग पुणे यांना दि. ९ / ९/ २० २३ रोजी दुसरे स्मरणपत्र दिले व सदर योजनाचा प्रशासनाने विचार न केल्यास दि. ३० / १० / २०२३ रोजी पासुन  हनुमंत धुमाळ (मुख्य अभियंता - विप्र ) जल संपदा विभाग पुणे यांचे कार्यालयासमोर "बेमुदत आमरण उपोषण " करील असा तिव्र इशारा दिल्याने प्रशासनाचे अधिकारी विलास हंडे यांनी वेळीच दखल घेऊन "प्रकल्प फेर नियोजनात घेतला आहे याकरीता उपोषण करु नये"असे सखोल चर्चेअंती छोटेखानी बैठकीत समजावून सांगितले.तथा
श्री.आंबेडकर यांना लेखी विनंती पत्र दिल्याने त्यामुळे दि.३० / १० / २० २३ रोजीचे त्यांचे उपोषण तात्पुरते स्वरूपात स्थगित करण्यात आले असून दि .१५/ १२ /२०२३ पर्यंत सर्व्हेक्षण पुर्ण न केल्यास दि.१६ /१२ / २०२३ रोजी पासून 'उपोषण' केले जाईल असे देखील या बैठकीत ठरविण्यात आले. 


याप्रसंगी प्रकल्प अधिकारी विलास हंडे , गणेश सिनलकर,, वसंतराव शिंदे , अब्बास मुजावर शेठ , सुधीर तांबे , बबनराव डावखर , चंद्रकान्त कुलकर्णी,डॉ. सुरेश खणकर आदी मान्यवर उपस्थित होते 
 प्रशासनाने दि. १५ / १२ / २०२३ पर्यन्त प्रकल्प अहवाल शासनास सादर केला नाही तर जल संपदा विभाग , पुणे कार्यालया समोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही श्री.आंबेडकर यांनी जलसंपदा विभाग , पुणे कार्यालयातील अधिकारी यांना दिला आहे.

 पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close