shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहाता तालुका समस्त मुस्लिम समाजातर्फे मराठा बांधवांसाठी पिण्याचे पाण्याचे नियोजन...!

अजीजभाई शेख , राहाता :-
रविवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी राहाता शहरात मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या एकच मिशन मराठा आरक्षण भेटीगाठी दौरा अंतर्गत येथील वीरभद्र प्रांगणात मराठ्यांच्या वाघ मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा महासभा संपन्न झाली.
या महासभेसाठी येणाऱ्या मराठा बांधवांसाठी राहाता तालुका समस्त मुस्लिम समाजातर्फे पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी साप्ताहिक भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन चे संस्थापक संपादक तथा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन कृती समितीचे शाह मुश्ताकअली, मुस्लिम ओबीसी राहाता तालुका अध्यक्ष शौकत तांबोळी, शहर अध्यक्ष समीर तांबोळी, हाजी अब्बासभाई, हारुनभाई तांबोळी, मुन्नाभाई (फिटर), बादशहाभाई, मुन्ना शाह, इरफानभाई, मौलाना साद, अश्पाकभाई बेग, साद तांबोळी, साजीद तांबोळी, जाहीद तांबोळी, उसामा तांबोळी, साईद तांबोळी, मुन्नाकाका सदाफळ, अनिल घोडे पाटील, सुनील सदाफळ पाटील, राहुल सदाफळ पाटील,भगवान डांगे साहेब आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close