चंद्रकांत झुरंगे -भोकर
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे महावितरणच्या दुर्लक्षीतपणामुळे विजेच्या शॉकसर्कीटमुळे तोडणीला आलेला साडेतीन एकर ऊस जळाला. पेटलेला ऊस विझविण्यासाठी अग्नीशामक सेवा उपलब्ध न झाल्याने अखेर कुटूंबियांनी व लगतच्या काही शेतकर्यांच्या मदतीने त्यातील केवळ अर्धा एकर ऊस बचावला असला तरी आता सध्या कुठलाच कारखाना सुरू नसल्याने हा ऊस तोडून जावू शकत नसल्याने या शेतकर्याचे मोठे नुकसान झाले.
खोकर गावालगत असलेल्या चव्हाण वस्तीपासून काही अंतरावर गट नं.१६७/२ मध्ये अभिजीत कारभारी चव्हाण यांचा गेल्या वर्षी दहाव्या महीन्यात लागण केलेला म्हणजेच तोडणीला आलेला साडेतीन एकर ऊस आहे. याच क्षेत्रात महावितरणचे रोहीत्र आहे. या रोहीत्रावर रविवार दि.८ आक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शार्टसर्कीट होवून खाली असलेल्या ऊसात आगीच्या ठिणग्या पडल्याने या ऊसाने पेट घेतला. हा प्रकार काही वेळानंतर सदरच्या शेतकर्याच्या लक्षात आल्यानंतर ओरडा करून मदतीसाठी धावा केला.
दरम्यानच्या काळात काहींनी अशोक कारखान्याच्या अग्नीशामन सेवेशी संपर्क केला परंतू गाडीचा बिघाड झालेला असल्याचे समजले त्यानंतर श्रीरामपूर नगरपरीषदेशी संपर्क केला असता तेथे ही संपर्क होवू शकला नाही शेवटी भर उन्हात निलेश चव्हाण यांनी आपल्या बागेत फवारणीसाठी असलेल्या ट्रॅक्टरवरील एच टी पी पंपम्पाचे मदतीने व इतरांच्या मदतीने हा पेटलेला ऊस विझविण्याचा प्रयत्न केला यात बराच काळ गेल्याने तोपर्यंत सुमारे तीन एकर ऊसाची होळी झाली.
या कामी येथील पोलीस पाटील डॉ.अनिकेत चव्हाण, अभिजीत चव्हाण, नंदकुमार चव्हाण, निलेश चव्हाण, अमोल कणगरे, बाबासाहेब राजपूत, रमेश कचरे, धुळेश्वर कचरे व पार्वतीबाई शिंदे आदिंनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. संबधीत शेतकर्याचे मोठे नुकसान होवूनही महावितरणने या प्रकाराची सायंकाळपर्यंत कुठलीही दखल घेतली नाही. या शेतकर्याचे सांत्वन करण्यासाठी किंवा नुकसाणीची पाहणी व पंचनामा करण्यासाठी महावितरणचे कुणीच न आल्याने शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
9561174111