shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युनियन अध्यापक विद्यालयाचा स्नेहमेळावा उत्साहात संप्पन्न


बी.आर.चेडे - शिरसगांव
अहमदनगर येथील युनियन अध्यापक विद्यालयाच्या सन १९८२-८४ या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. 
स्नेहमेळावा विद्यालयाच्या माजी प्राचार्या श्रीमती विमलताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संप्पन्न झाला. 

४० वर्षाच्या प्रदीर्घ काळावधीनंतर हा भेटीचा योग जुळून आणण्यासाठी   श्रीगोंदयांचे माजी केंद्रप्रमुख गजानन ढवळे (बापू) यांनी विशेष पुढाकार घेतला. ४० विद्यार्थ्यांची बॅच आज ९० टक्के सेवानिवृत्त झालेली आहेत. मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी प्रा.मारडकर, प्रा.आंधळे, प्रा.श्रीम. व्यवहारे, प्रा.वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते .

यावेळी उपस्थित प्राध्यापक यांना चांदीचे नाणे, शाल श्रीफळ देवून गौरविण्यात आले. 
 मान्यवर प्राध्यापक यांचे हस्ते सन १९८२-८४ बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, शाल,श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. 

या प्रसंगी अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना प्राचार्या श्रीमती विमल गायकवाड यांनी युनियन अध्यापक विद्यालयाच्या या बॅचने सर्व आघाड्यांवर यश संपादन करून युनियन अध्यापक विद्यालयाचे नाव मोठे केले. याचा आम्हाला व विद्यालयाला अभिमान वाटतो. 
यावेळी सर्व प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त केले, 
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नवनाथ अकोलकर, संजय शेळके, शमशुद्दीन इनामदार, संभाजी पवार, रावसाहेब गोर्डे, प्रभाकर रोकडे, गजानन ढवळे, विलास मुनोत,राजाराम टपळे यांनी मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छाया कुलथे, भिमाबाई शिंदे, सुनिता मकासरे रफत खान, श्रीमती रेखा कळंबे, चित्रकौर रजपूत,सौ.शेळके(आमले) मदन ढोले, विजय शेळके, रशिद शेख, नंदू परदेशी, राधू गोफणे, अनिल नलगे,   आदि प्रयत्नशील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन ढवळे यांनी तर सूत्रसंचालन शिव व्याख्याते संजय शेळके तर आभार छायाताई कुलथे यांनी मानले.

*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close